ETV Bharat / science-and-technology

गुगल पिक्सेल बड्स ए सिरीज लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये - latest gadgets news

एकवेळ चार्जिंग केल्यानंतर 24 तासापर्यंत एअरबड्सची चार्जिंग टिकते. तर १५ मिनिटे चार्जिंग केल्यास एअरबड्सची ऐकण्यासाठी तीन तासापर्यंत चार्जिंग टिकते.

पिक्सेल बड्स ए सिरीज
पिक्सेल बड्स ए सिरीज
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:52 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - पिक्सेल बड्स ए-सिरीजची चूकून ट्विटरवर घोषणा झाल्यानंतर गुगलने अधिकृतपणे पिक्सेल बड्स ए-सिरीजची आज लाँच केले आहेत. हे टीडब्ल्यीएस एअर बड्स ९९ डॉलरला उपलब्ध होणार आहेत.

पिक्सेल बड्स ए-सिरीज हे अमेरिका आणि कॅनडामध्ये १७ जूनपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. स्पीकरच्या सर्व श्रेणीचा पूर्ण क्षमतेने अनुभव घेण्यासाठी, विशेषत: कमी फ्रिक्वन्सीसाठी गुड सील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेही वाचा-टेस्लानंतर अमेरिकेची दुसरी इलेक्ट्रिक कंपनीही भारतात येणार- नितीन गडकरी

हे आहेत पिक्सेल बड्स ए-सिरीजची वैशिष्ट्ये

  • पिक्सेल बड्स ए-सिरीज तयार करण्यासाठी हजारो कानांचे परीक्षण करण्यात आले आहे.
  • एअर बडमध्ये अॅडाप्टिव्ह साउंड आहे. त्यामुळे भोवतालच्या आवाजाप्रमाणे ध्वनी कमी अथवा जास्त होतो.
  • वापरकर्त्यांना हे एअरबड्स घरी किंवा रस्त्यावरच्या गोंगाटातही वापरणे सहजशक्य होते. तसेच मोठ्या बांधकामाजवून रस्त्यावर धावताना आवाजाचा अडथळा येत नाही.
  • एकवेळ चार्जिंग केल्यानंतर 24 तासापर्यंत एअरबड्सची चार्जिंग टिकते. तर १५ मिनिटे चार्जिंग केल्यास एअरबड्सची ऐकण्यासाठी तीन तासापर्यंत चार्जिंग टिकते.
  • कनेक्टिव्हिटी बग्स आणि ऑडिओ कटआऊटस टाळण्यासाठी गुगलने काही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पिक्सेल बड्स ए-सिरीज ही डार्क ओलिव्हमध्येही उपलब्ध आहे.
  • प्रेरणेसाठी कंपनीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे. वापरकर्त्याला आल्हाददायक आणि शांतीचा अनुभव येण्यासाठी टोन तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-देशाच्या राजधानीत बेरोजगारीने गाठला कळस; मेमध्ये 45.6 टक्क्यांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.