ETV Bharat / opinion

कोविड-१९वरील 'न्यूट्रल अँटीबॉडीज'ची शोधमोहीम.. - कोरोना अँटीबॉडी एक्स-रे

कोरोना महामारीवरील प्रतिबंधात्मक उपचार पद्धती शोधण्यासाठी किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावरील उपचार पद्धती शोधण्यासाठी अमेरिकास्थित जागतिक दर्जाची टीम कठोर परिश्रम घेत आहे.

X-ray Experiments Zero in on COVID-19 Antibodies
कोविड-१९वरील 'न्यूट्रल अँटीबॉडीज'ची शोधमोहीम
author img

By

Published : May 25, 2020, 8:26 PM IST

हैदराबाद : कोविड-१९च्या प्रादुर्भावास जबाबदार असलेल्या सार्स कोव्ह २ या कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत असताना, व्हायर बायोटेक्नॉलॉजीच्या डेव्हिड कॉर्टी आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या डेव्हिड वेसलर यांच्या नेतृत्वातील जागतिक दर्जाची एक टीम कोविड-१९वरील प्रतिबंधात्मक उपचार म्हणून किंवा पोस्ट एक्सपोजर थेरपी म्हणून वापरल्या जाऊ शकणार्‍या तटस्थ प्रतिपिंडे (न्यूट्रल अँटीबॉडीज) शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.

लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी (बर्कले लॅब) अ‌ॅडव्हान्सड लाइट सोर्सने (एएलएस) एकत्रित केलेल्या डेटानुसार, सार्समधून बरे झालेल्या रुग्णांमधील अँटीबॉडीज इतर लोकांना दिल्यास त्यांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सार्स कोव्ह २ तसेच इतर कोरोना विषाणूंचा प्रवेश रोखण्याचे काम या अँटीबॉडीज करतात. याच आठवड्यात नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनावर मात करणारा अँटीबॉडी क्लिनिकल ट्रायल्सच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे शात्रज्ञांनी म्हटले आहे.

२०१९च्या शेवटच्या कालखंडात सार्स-कोव्ह-२चा उद्रेक झाल्यानंतर लगेचच वेसलर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २००३ आणि २०१३ मध्ये आलेल्या सार्स आणि मर्स मधून बचावलेल्यांमध्ये संभाव्य तटस्थ प्रतिपिंडे शोधण्याची तपासणी सुरू केली.

ही प्रतिपिंडे कोरोना विषाणूच्या ग्लायको प्रोटीनला कसे अडथळा आणते हे समजून घेण्यासाठी आणि या प्रतिपिंडांचे पुनरुत्पादन करण्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी, या पथकाने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ आर्नोल्ड आणि मेबेल बेकमॅन क्रायओएम सेंटर येथे क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची चाचणी घेण्यात आली. तसेच स्ट्रक्चरल बायोलॉजीच्या (बीसीएसबी) बर्कले सेंटरद्वारे व्यवस्थापित एएलएस बीमलाइन ५.०.२ येथे एक्स- रे क्रिस्टलोग्राफी सादर केली गेली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.