ETV Bharat / opinion

अध्यक्षीय मतदान पुढे ढकलण्याची ट्रम्प यांची मागणी मान्य होण्याची शक्यता कमीच - रविंद्र सचदेव

author img

By

Published : Aug 3, 2020, 7:11 PM IST

कोविड-१९ महामारीची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची सातत्याने टीका होत असताना आणि ओपिनियन पोल्सच्या निकालांमधून आपण मागे पडत असल्याचे दिसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र त्याला खुद्द रिपब्लिकन नेत्यांनी देखील ही मागणी फेटाळत हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. पाहा परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ रविंद्र सचदेव यांनी केलेले हे विश्लेषण..

Trump bid to defer presidential poll has little chance
अध्यक्षीय मतदान पुढे ढकलण्याची ट्रम्प यांची मागणी मान्य होण्याची शक्यता कमीच..

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची सातत्याने टीका होत असताना आणि ओपिनियन पोल्सच्या निकालांमधून आपण मागे पडत असल्याचे दिसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र त्याला खुद्द रिपब्लिकन नेत्यांनी देखील ही मागणी फेटाळत हे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान न होता मेल-इन (पोस्टल) मतदान होण्याच्या शक्यतेमुळे अध्यक्षीय मतदान पुढे ढकलण्यात येईल, असे सांगत ट्रम्प यांनी गुरुवारी एका नव्या वादाला तोंड फोडले.

“२०२० मध्ये युनिव्हर्सल मेल-इन मतदान घेणे (किमान मतदानच होणार नाही अशी परिस्थिती नाही हे एक त्यातले त्यात चांगले) ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात अयोग्य आणि फसवणूक करणारी निवडणूक असेल. ही निवडणूक म्हणजे यूएसए समोर एक मोठा पेच असेल. जोपर्यंत लोक योग्य पद्धतीने आणि सुरक्षितपणे मतदान करू शकत नाहीत तोपर्यंत निवडणुकीला उशीर करणे योग्य होणार नाही का??? ” असे ट्विट ट्रम्प यांनी केले.

पोस्टल मतदानाच्या पूर्वीपासूनच विरोधात असलेल्या ट्रम्प यांनी पोस्टल मतदान हे घोटाळ्यांना प्रोत्साहन देणारे आणि यामुळे चुकीचे निकाल समोर येतील असे सुचवत आपले मत व्यक्त केले असले तरी त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी मात्र ही कल्पना फेटाळून लावली आहे.

“या अगोदर इतिहासात अगदी युद्ध, डिप्रेशन किंवा गृहयुद्धाच्या परिस्थितीत देखील नियोजित फेडरल निवडणुका वेळेवर पार पडल्या आहेत. या वर्षी देखील तीन नोव्हेंबरच्या नियोजित निवडणुकीसाठी मार्ग काढता येईल,” असे सिनेटमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचे नेते आणि केंटकी प्रांतातील रिपब्लिकन प्रतिनिधी मिच मॅक्कॉनेल यांनी माध्यमांना सांगितले.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधील अल्पसंख्यांक पक्षाचे प्रतिनिधी आणि कॅलिफोर्नियातील रिपब्लिकन नेते केविन मॅकॉर्थी यांनी देखील याच प्रकारचे मत व्यलत करत, “फेडरल निवडणुकांच्या इतिहासात वेळेवर निवडणूक न घेण्याची कधीच वेळ आली नाही या वेळी देखील ती वेळेवर पार यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत”.

यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक पार पडणार आहे.

कोविड-१९ महामारी हाताळण्यात ट्रम्प प्रशासनाला अपयश आल्याची सातत्याने टीका होत आहे. या महामारीमुळे आतापर्यंत तब्बल १ लाख ५० हजारांहून अधिक अमेरिकन नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्याचबरोबर, वंशवाद आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या इतर देशांतर्गत प्रश्नांबद्दलचा ट्रम्प यांचा दृष्टिकोन याविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

ओपिनियन पोल्सच्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प हे माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यातुलनेत खूप मागे पडले आहेत.

उदाहरणार्थ, रिअल क्लीअर पॉलिटिक्सच्या आकडेवारीवर आधारीत फायनान्शियल टाईम्सच्या पोल ट्रॅकरवरून जाहीर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बिडेन हे ५३८ पैकी ३०८ इलेक्टॉरेल कॉलेजेसची मते जिंकू शकतात तर ट्रम्प यांना केवळ १२८ मतांवर समाधान मानावे लागेल असे दिसून आले. व्यवस्थापित करू शकतात. विजयी उमेदवाराला ५३८ पैकी २७० मते मिळवणे आवश्यक आहे.

दरम्यान वर्तमान अध्यक्ष ट्रम्प असा दावा करत आहेत की अशा मतदानात त्यांच्यासोबत असलेल्या मौन बाळगलेल्या जनतेच्या आवाजाचे प्रतिबिंब पडत नाही.

परंतु या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की, ट्रम्प मतदानाची तारीख पुढे ढकलून अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी वेळ मिळावी यासाठी प्रयत्नशील असले तरी तसे होणार नाही कारण ते अमेरिकेच्या घटनाविरोधी असेल.

यूएस इंडिया पॉलिटिकल अँक्शन कमिटीचे संस्थापक सदस्य रबिंदर सचदेव याविषयी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण घटनात्मकरीत्या अमेरिकन कॉंग्रेसने निवडणुकीची तारीख अनिवार्य केली आहे. त्यामुळे या तारखेत बदल करावयाचा असल्यास काँग्रेसच तो बदल करू शकते. घटनेनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी निवडणूक घेण्याची तरतूद आहे."

सचदेव म्हणाले, “राष्ट्रपति ट्रम्प किंवा कोणत्याही राष्ट्रपतींकडे ती तारीख बदलण्याचा अधिकार नाही. मात्र आणीबाणी सारख्या आपत्कालीन परिस्थितीत अध्यक्ष आपला अधिकार वापरून आणीबाणी जाहीर करून मग निवडणुकांच्या तारखा बदलल्या किंवा पुढे ढकलल्या जाऊ शकतील असे एकमेव प्रावधान घटनेत आहे. तथापि, हे लक्षात घ्यावे लागेल की अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी कधीही निवडणुकीची तारीख बदलली गेलेली नाही. तारीख बदलली गेली तर अमेरिकन लोकशाहीच्या कल्पनेला मोठा धक्का बसू शकेल.”

दरम्यान ट्रम्प यांनी देखील आपल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचार मोहीम सुरु केली आहे. यावेळी, अमेरिकन अर्थव्यवस्थेची भरभराट होत असून शेअर बाजार देखील तेजीत आहे, बेरोजगारीचे प्रमाण खाली आले आहे आणि कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे ते मतदारांना पटवून देत आहे. एकंदरीतच, 'अमेरिकेला पुन्हा महान देश बनविण्याच्या' २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळील घोषणेचा पुनरुच्चार करीत आहेत.

बिडेन देखील हेच मुद्दे उपस्थित करीत आहेत. परंतु, अमेरिकेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तेच सक्षम असल्याचे मतदारांना पटवून देत आहेत.

सचदेव म्हणाले, “अमेरिकेतील प्रत्येक घटक नाखूष आहे. मग तो रिपब्लिकन समर्थक असो की डेमोक्रॅट."

“दरम्यान, ट्रम्प नाखूष घटकांचा मुद्दा पुढे करत आपल्या समर्थकांना आणि अमेरिकेच्या जनतेला साद घालत काही लोक मला माझे काम करू देत नसल्याचे सांगत आहेत. मात्र, मी माझ्या क्षमतेची पराकाष्ठा करत सर्वतोपरी योदान देण्याचा प्रयत्न करीत असून अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असल्याचे सांगत बेरोजगारी देखील कमी झाल्याचे पटवून देत आहेत. तसेच आपल्याला ओपिनियन पोल्स किंवा त्यामधून जाहीर होणाऱ्या आकड्यांनी फरक पडत नाही. कारण, देशातील बहुसंख्य मौन बाळगलेली जनता माझ्यासोबत असल्याचा दावा करत अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी ते मला निवडून देतील असे सांगत आहेत."

सचदेव यांच्या मते, बिडेन हे ट्रम्प यांना अधिक बोलण्याची संधी देत आहेत कारण त्यांच्या वक्तव्यामुळे नवनवीन वाद आणि विरोधाभास समोर येत आहेत ज्यामुळे त्यांना अधिकच आव्हान निर्माण होत आहे.

“बिडेन हे अमेरिकेच्या देशांतर्गत धोरणांना अधोरेखित करीत अमेरिकेला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी आपण अधिक सक्षम असल्याचे जनतेला पटवून देत आहेत. तसेच ट्रम्प यांच्यामुळे कसे नुकसान झाले, चांगल्या संस्था कशा डळमळीत झाल्या हे सांगताना हे सर्व पूर्ववत करण्यासाठी त्यांच्यासारख्या म्हणजेच बिडेनसारख्या सुज्ञ राजकारण्याची भूमिका अधोरेखित करत आहेत. "

- अरुणिम भुयान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.