ETV Bharat / opinion

कोविड-१९ वरील लसीसाठी नेपाळची चीन आणि भारताकडे नजर

कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट वाढण्याची भीती व्यक्त होत असताना नेपाळने भारत आणि चीन या आपल्या दोन शेजारी देशांकडून कोरोनावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी चर्चा सुरू केली केली आहे.

कोविड-१९ वरील लसीसाठी नेपाळची चीन आणि भारताकडे नजर
कोविड-१९ वरील लसीसाठी नेपाळची चीन आणि भारताकडे नजर
author img

By

Published : Mar 23, 2021, 8:39 PM IST

कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट वाढण्याची भीती व्यक्त होत असताना नेपाळने भारत आणि चीन या आपल्या दोन शेजारी देशांकडून कोरोनावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी चर्चा सुरू केली केली आहे. नेपाळला चीनकडून भेट स्वरुपात सिनोफर्मने विकसित केलेली लस मिळत असली तरी नेपाळने एका वर्षात देशातील जवळजवळ सर्वच लोकांना लस देण्याची योजना आखल्यामुळे भारतातील लसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारताकडून सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे दहा लाख डोस मिळाल्यानंतर नेपाळने 27 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू केली होती. भारताने 'लस डिप्लोमसी' अंतर्गत भेट म्हणून ही मदत नेपाळला केली होती. नेपाळने त्यानंतर लगेच सीरमकडून कोविशिल्ड लस आणि अ‍ॅस्ट्राझेंकाकडून कोवॅक्सिन लस विकत घेतली. डब्ल्यूएचओच्या धोरणानुसार अल्प विकसित देशांना लसपुरवठ्याची हमी दिली होती, त्याअंतर्गत या लसी नेपाळने मिळवल्या.यामुळे नेपाळमधील आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, सरकारी अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसह गरजू गटातील 1.7 दशलक्ष लोकांना लस देण्यात मदत झाली.

नेपाळने दुसर्‍या टप्प्यात कोरोना व्हायरसची लागण होण्याची आणि त्याचे घातक परिणाम होण्याची अधिक शक्यता असलेल्या लोकांना लस देण्याची योजना आखली आहे. नेपाळमधील 55 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची योजना आखली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्ड पुरवठ्यांची नेपाळ वाट पाहत असताना, चीनकडूनही नेपाळला लसीच्या पुरवठ्याची आशा आहे. नेपाळचे आरोग्यमंत्री हृदयेश त्रिपाठी यांनी अलीकडेच काठमांडूमध्ये भारत आणि चीनच्या राजदूतांशी याबाबत बोलणी केल्याचे सांगितले. तसेच चीनला सिनोफर्मने विकसित केलेल्या लसीचे 8,00000 डोस आणण्यासाठी सरकार या आठवड्यात चीनला विमान पाठवत असल्याची माहिती दिली. चीनकडून भेट स्वरुपात नेपाळला ही लस मिळणार आहे.

तरीही एवढेच डोस पुरेसे होणार नाहीत. नेपाळमध्ये जवळपास 30 पैकी 20 दशलक्ष लोकांना लसीकरण करण्याची योजना आहे. एका वर्षाच्या आत हे लसिकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण लोकसंख्येचा विचार करता ३० दशलक्षपैकी १८ वर्षाखालील युवा वर्ग सोडला तर इतर २० लाख लोकांना पुढच्या जानेवारीअखेर लस मिळणे अपेक्षित आहे. आरोग्य मंत्री हृदयेश त्रिपाठी यांना वाटते की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे साध्य करण्यासाठी नेपाळला मदत करू शकेल. त्यांनी डिजिटल वृत्तपत्र सेतोपती डॉट कॉमला सांगितले की, “लस पुरवठा करण्यासंदर्भात नेपाळचे सीरमशी चांगले संबंध आहेत. यापूर्वी आम्हाला सिरमने लस पुरवली आहे आणि आम्हाला आशा आहे की या वेळीही आम्हाला पुरेशी कोविशिल्ड लस पुरविण्यात येईल."

नेपाळला माफक किंमतीत लस हवी आहे. सुरुवातीला सीरमने नेपाळला कोविशिल्डच्या लसीला प्रती डोस 4 अमेरिकन डॉलर्स आकारले आहेत. इतर लसींच्या तुलनेत ही अधिक चांगली किंमत असल्याचे अधिकाऱ्यांनाही वाटते. आणि कोविशिल्डच्या अधिक पुरवठ्याची वाट पाहात असताना, ही लस महाग होत आहे याची चिंताही नेपाळच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आहे. नेपाळ नवीन ऑर्डर देण्याच्या विचारात असतानाच आता कोविशिल्डची किंमत प्रति लस 5 अमेरिकन डॉलरपर्यंत वाढली आहे.

लस पुरवठा करणाऱ्या एजंटसाठी 10 टक्के कमिशन द्यावे लागत असल्याने लस महागली असल्याचे आरोग्यमंत्री त्रिपाठी यांनी सांगितले. तर अशा प्रकारचे कमिशन टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यामुळे पुरवठ्याला विलंब होत असल्याचे ते म्हणाले. नेपाळने १५ मार्चपर्यंत २.२ दशलक्षांहून अधिक लोकांच्या पीसीआर चाचण्या घेतल्या आणि त्यात 2,75,००० लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, तर ३ हजार १४ जणांचा मृत्यू झाला. आता, कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे प्रामुख्याने भारत आणि इतर देशांमधून परत आलेल्या लोकांमध्ये आढळली आहेत, त्यामुळे दुसऱ्या लाटेची भीतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

- सुरेंद्र फुयल

(लेखक हे नेपाळमधील मुक्त पत्रकार आहेत)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.