ETV Bharat / opinion

लडाख सीमारेषेवर चीनवर कारवाई करण्यास भारत कचरतोय : अँटोनी

author img

By

Published : Sep 1, 2020, 11:07 AM IST

“चीनला आता कळाले आहे की, भारत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे चीनी ड्रॅगन जास्तच आक्रमक झाला आहे. भारत सरकार चीनवर कारवाई करण्यास का कचरत आहे, असा विचार प्रत्येकजण करत आहे” असे अँटोनी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काल पँगोंग त्सो सरोवर क्षेत्रात चीनने एलएसीचे उल्लंघन केल्याबद्दल विचारले असता, भारतीय सैन्याने असे काही घडले असल्याचे नाकारले आहे.

India hesitant to take action in Ladakh border row with China: Antony
लडाख सीमारेषेवर चीनवर कारवाई करण्यास भारत कचरतोय : अँटोनी

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या घुसखोरीवर कारवाई करण्यात भारत कचरत आहे, असे मत माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी व्यक्त केले आहे. सध्याची दक्षिण आशियाई देशांची स्थिती लक्षात घेत आशियाई ड्रॅगन जरा जास्तच आक्रमक झाला आहे, असेही ते म्हणाले.

“चीनला आता कळाले आहे की, भारत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे चीनी ड्रॅगन जास्तच आक्रमक झाला आहे. भारत सरकार चीनवर कारवाई करण्यास का कचरत आहे, असा विचार प्रत्येकजण करत आहे” असे अँटोनी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काल पँगोंग त्सो सरोवर क्षेत्रात चीनने एलएसीचे उल्लंघन केल्याबद्दल विचारले असता, भारतीय सैन्याने असे काही घडले असल्याचे नाकारले आहे.

भारताच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले की, आता जवळजवळ गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये चीनी लोकांच्या लिबरेशन आर्मी ट्रुप्स एलएसीचे उल्लंघन करत आहेत. ज्यामुळे १५ जून रोजी गलवान खोऱ्यात पीएलएच्या सैन्यानी केलेल्या प्राणघातक चकमकीत भारताने २० सैनिक गमावले. पुष्टी न केलेल्या अहवालात, या चकमकीत पीएलएचे ४० सैनिक मरण पावल्याचे सांगितले गेले आहे, मात्र चीनने याबाबत अजून एक शब्दही उच्चारला नाही.

“ गेल्या चार महिन्यांपासून सीमा क्षेत्रात सातत्याने हल्ले होत आहेत. आतापर्यंत भारत सरकार फक्त निवेदने देण्याची कामं करत आहे. तर दुसरीकडे चीन मात्र सीमा क्षेत्रात आपल्या सैन्याची जमवाजमव करत आहे, ” असेही अँटोनी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पीएलए आपल्या सैन्याची जमवाजमव फक्त पूर्व लडाखमध्येच करत नाहीये, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील भारत-चीन सीमेवरही ही जमवाजमव सुरू आहे.

“यापूर्वी ज्या भागात भारतीय सैनिक गस्त घालत असायचे, त्या भागात आता भारतीय गस्ती पथकांना गस्त घालण्याची परवानगी पीएलएचे सैनिक देत ​​नाहीत.” असेही अँटोनी यांनी सांगितले.

माजी संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, पीएलएच्या सैन्यांविरुध्द भारत कोणतीही कारवाई करण्यास डगमगत आहे. यावरून हे अधोरेखित होते की, “चीनी आक्रमणाला सामोरे जाण्याची आपली इच्छाशक्तीच नाही”. दुसरीकडे अशा प्रकारच्या कोणत्याही आक्रमणाला सामोरे जाण्यासाठी माजी संरक्षणमंत्री पूर्णपणे तयार आहेत, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

“२०१३ मध्ये देखील अशीच एक घटना डेपसांग सरोवर भागात घडली होती. जिथून चिनी सैन्यांनी अखेर माघार घेतली होती आणि याठिकाणी पून्हा शांतता प्रस्थापित झाली,” याची आठवणही अँटोनी यांनी यावेळी करुन दिली.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात अँटोनी सात वर्षांपेक्षा अधिक काळ संरक्षणमंत्री राहिले आहेत. तसेच अँटोनी यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेबाबत संसदेत सविस्तर निवेदन सादर करताना सैन्य, हवाई दल आणि नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण बजेट वाढवण्याची गरज मान्य केली होती.

अँटोनी यांची मतं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी फार अनुरुप आहेत. जे गेल्या काही दिवसांपासून भारत- चीन लडाख सीमाप्रश्नावरुन सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. सध्या दोन्ही देशांनी सीमा क्षेत्रात आपले सैन्य तैनात केले असून दोन्ही देशांतील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात खालच्या पातळीवर पोहचले आहेत.

- अमित अग्निहोत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.