हैदराबाद : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच आणलेल्या निर्बंधामुळे फक्त एच-1बी व्हिसावर नाही, तर अनेक जगभरातल्या व्हिसांवर परिणाम झाला आहे. हे नवे नियम अमेरिकेच्या बाहेरच्या नागरिकांसाठी आहेत. ज्यांच्याकडे वैध अनिवासी व्हिसा आणि इतर अधिकृत प्रवासी कागदपत्रे नाहीत, त्यांनाही हा नियम लागू आहे. जे नागरिक वैध प्रवासी कागदपत्रे, पासपोर्टवर अधिकृत व्हिसा शिक्का घेऊन परदेशात जातात, त्यांच्यासाठी हा नियम नाही. या निर्बंधांचे परिणाम कोणावर होणार आहेत ते आता पाहू –
- एच-1 बी व्हिसाधारक
अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांची बुद्धिमत्ता पाहून नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे एच-1 बी व्हिसा आहे. या वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून अमेरिकेचे २०२१ हे आर्थिक वर्ष सुरू होईल आणि भारतातल्या बऱ्याच कंपन्यांनी संबंधित एच-1 बी व्हिसा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबावे लागेल. त्यानंतरच त्यांच्या प्रवासासंबंधी कागदपत्रांवर शिक्का मारला जाईल आणि ते परदेशात जाऊ शकतील.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिसा स्टेटस बदलायचे आहे
अमेरिकेत जे वैध कागदपत्रांसह राहत आहेत, त्यांना हे नियम लागू नाहीत. तसेच जे विद्यार्थी तिथे ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT)’अंतर्गत राहत आहेत आणि त्यांना एच1बी व्हिसा हवा आहे, त्यांच्यावर या नियमांचा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या मते या विद्यार्थ्यांनी आता अमेरिका सोडून जाऊ नये आणि नंतर पुन्हा त्यांनी इथे प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तर नव्या नियमांचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.
- एच-2 बी व्हिसा
हा व्हिसा बिगर कृषी क्षेत्रातल्या तात्पुरत्या कामगारांना दिला जातो. एका वर्षात तो जास्तीत जास्त ६६ हजार लोकांना मिळतो. आता नव्या नियमांनुसार ज्यांना अन्न प्रक्रिया आणि हॉटेलमध्ये काम करायचे आहे, त्यांना देशात प्रवेश मिळणार नाही.
- एच-4 व्हिसा
अमेरिकेत काम करण्याची इच्छा असलेले, एच-1 बी व्हिसा असलेल्यावर अवलंबून असलेले त्यांचे जोडीदार आणि मुले यांना हा व्हिसा दिला जातो. याशिवाय जे-1 व्हिसा असलेल्यांवर अवलंबून असलेले नवरा-बायको, मुले यांना जे-2 दिला जातो. एल-1 व्हिसाधारकांवर अवलंबून असलेल्याला एल-2 व्हिसा दिला जातो. आता या नव्या नियमांचा परिणाम यांच्यावर होऊ शकतो.
- एल-1 व्हिसा
एल-1 व्हिसा कंपन्यांमधल्या अंतर्गत बदल्यांसाठी आहे. नव्या नियमानुसार परदेशात असलेल्या व्यक्तीची आता अमेरिकेतील त्याच कंपनीत बदली होऊ शकणार नाही.
एच-1बी व्हिसा -
अमेरिका वर्षाला ५०,००० व्हिसा जारी करते.
त्यात ३०,००० भारतीय असतात.
आता या नव्या नियमांमुळे ३ लाख भारतीयांचे नुकसान होणार, असे म्हटले जात आहे.
अमेरिकेत एच-1 बी व्हिसा असलेले भारतीय ट्रम्प यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत -
ट्रम्प म्हणतात, कोरोनामुळे नोकरी गेलेल्या कोट्यवधी अमेरिकन नागरिकांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ५,२५,००० अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळू शकतात. गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंसहित अनेक सीईओंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हिसा देण्याच्या निर्णयावर राष्ट्राध्यक्षांनी फेरविचार करावा अशी सूचना भारतीय वंशाचे सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांनी केली आहे. त्यांच्या मते कोरोना साथीनंतरच्या परिस्थितीत अमेरिकन अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करताना या निर्णयाचे परिणाम होतील. काही वरिष्ठ सिनेटर्सच्या मते व्हिसा धोरण स्थगित करू नये, तर सध्याच्या परिस्थितीशी अनुकूल असे बदल करावेत. त्यांना वाटते, अशा निर्णयांमुळे अमेरिकेची आर्थिक वाढ पुन्हा रुळावर आणणे कठीण होऊन जाईल. काही जणांचे असेही मत आहे की अमेरिकन कंपन्यांवर भारतीयांऐवजी अमेरिकन्सना नियुक्त केल्याने आर्थिक बोजा वाढेल.
तेलुगू अनिवासी भारतीयांवर या निर्णयाचा परिणाम -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा देण्याची प्रक्रिया स्थगित केल्याने तेलुगू राज्यातील अनेक तरूण संभ्रमात पडले आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथल्या अनेक स्थलांतरीतांना इथेच राहावे लागते आहे. ते अमेरिकेत परत जाऊ शकत नाहीत. अगदी अधिकारी हे मान्य करतात की अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी पुरेसे पात्र आणि कुशल तंत्रज्ञ नाहीत. एका आकडेवारीनुसार फक्त २९ टक्के अमेरिकन्स ही जागा घेऊ शकतात. बाकीचे भारतातून आलेलेच आहेत. नोकरी देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी सांगतात की, या नव्या निर्णयाचा परिणाम इतर प्रकल्पांवरही होईल.
लाॅटरीने निवडलेले २५ हजार लोक नाराज -
अमेरिकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या योग्य व्यक्तींची दरवर्षी लाॅटरीने निवड केली जाते. निवड झालेल्या व्यक्तींची व्हिसा प्रक्रिया सुरू होते. या वर्षीची लाॅटरी प्रक्रिया दीड महिन्यांपूर्वीच झाली. ही प्रक्रिया झाल्या झाल्याच कोरोना विषाणूंचा उच्छाद सुरू झाला. तेव्हा अमेरिकन सरकारने जगभरातले सर्व दूतावास बंद केले. यामुळे निवडलेले अर्ज तसेच राहिले. व्हिसा कन्सल्टंटना सांगण्यात आले की, दोन तेलुगू राज्यांमधून २५ हजार लोकांची निवड करण्यात आली होती. या बंदीमुळे अमेरिकेची दारे त्यांच्यासाठी बंद झाली. कोरोनानंतरच्या काळात या सर्व अर्जदारांसाठी त्यांचे नशीब आजमावण्यासाठी पुन्हा एकदा लाॅटरी प्रक्रिया करावी लागेल, असे अमेरिकेच्या अॅटाॅर्नींनी ‘इनाडू’शी बोलताना सांगितले.
या परिस्थितीत जे एच-1बी व्हिसा वाढवण्यासाठी भारतात आलेत, त्यांना आता पुढचे सहा महिने तरी अमेरिकेला परतता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अजयकुमार वेमुलापती यांच्या प्रतिनिधीने सांगितले.
हेही वाचा : व्हिसावर निर्बंध आणण्यात आल्याने भारताच्या आयटी क्षेत्रावर होणार परिणाम