ETV Bharat / opinion

कोविड १९च्या संशोधनासाठी एफडीएने मंजूर केलेल्या 'लेन्झिल्युमब'च्या तिसऱ्या फेजची चाचणी... - सायटोकिन स्टॉर्म

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील औषधनिर्माण कंपनी 'ह्यूमनगेन'ने जाहीर केले आहे की, यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोविड १९च्या तिसऱ्या फेजमधील अभ्यासासाठी रुग्णाला डोस देण्यात आला आहे. कोविड १९ने त्रस्त आणि सर्वात जास्त जोखीम असलेल्या रुग्णांमध्ये कोविडचा गंभीर परिणाम रोखण्याच्या उद्देशाने कंपनीने कृत्रिम अँटीबॉडी 'लेन्झील्युमब'च्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.

First Patient Dosed in FDA-Approved Phase III Lenzilumab Study for COVID-19
कोविड १९च्या संशोधनासाठी एफडीएने मंजूर केलेल्या 'लेन्झील्युमब'च्या तिसऱ्या फेजची चाचणी..
author img

By

Published : May 10, 2020, 7:48 PM IST

हैदराबाद : 'सायटोकिन स्टॉर्म'वरील प्रभावी औषध बनविण्यासाठी लक्ष केंद्रित केलेल्या 'ह्यूमनगेन' या औषधनिर्माण कंपनीने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोविड १९च्या तिसऱ्या फेजमधील अभ्यासासाठी रुग्णाला 'लेन्झिल्यूमब' डोस देण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर जेंव्हा शरीरातील पेशी आपल्याच पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात, त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी आवश्यक मॅक्रोफेज उत्तेजक घटक (GM-CSF) असलेले कृत्रिम अँटीबॉडी 'लेन्झील्युमब'ची कंपनी निर्मिती करते.

“आम्ही अमेरिकेतील काही प्रमुख संशोधन केंद्रे, रुग्णालयातील तज्ज्ञ आणि आमची कंत्राटी संशोधन संस्था सीटीआय यांच्या बरोबर मिळून उच्च दर्जाच्या लेन्झील्युमबच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरून दवाखान्यात भरती झालेल्या आणि कोविडची सर्वात जास्त जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना यापासून वाचविता येईल. या प्रक्रियेत असलेल्या अनुभवामुळे आम्हाला उत्तेजन मिळत असून आम्ही भागधारकांसोबत काम करण्यास आणि माहिती देण्यास उत्सुक आहोत," असे ह्यूमनगेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कॅमेरून डुरंट यांनी म्हटले आहे.

ज्या वेगाने एफडीएची मंजूरी मिळून कामाला सुरुवात झाली आहे त्याबद्दल सीटीआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टिम श्रोएडर यांनी आनंद झाला असल्याचे म्हटले.

IL-6, IL-1 आणि TNF-α या वेगवेगळ्या सायटोकिन स्टॉर्मच्या प्रकारांमध्ये GM-CSFचा वापर केला गेला असल्याचे डॉ. डुरंट यांनी सांगितले. GM-CSFचा प्रभावी मारा केल्यानंतर सायटोकिन स्टॉर्मचा परिणाम कमी करण्यात किंवा त्याला रोखण्यात यश आले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मागील तीन वर्षांपासून आम्ही या क्षेत्रात काम करत असून या प्रकारे सायटोकिन स्टॉर्मबद्दल संशोधन करणारी आम्ही एकमेव कंपनी असल्याचे डुरंट यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भातील प्रकाशित झालेली माहिती, गंभीर श्वसनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांची माहितीसह इतर महत्त्वपूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एफडीए, सीटीआय, अन्य भागीदार, संशोधक आणि कर्मचार्यांप्रती त्यांनी आभार व्यक्त केले.

हेही वाचा - लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या साधणार संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.