हैदराबाद (तेलंगाणा) : भारताच्या कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत अत्यंत उपयोगी ठरण्याकरिता संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) एक बहुउद्देशीय 'नो-टच' दरवाजा उघडण्याचे साधन आणि जंतुनाशक कागद विकसित केला आहे. जो कदाचित कोरोना रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरु शकतो.
दरवाजा उघडण्याचे साधन (डोर ओपनिंग टूल)..
हैदराबाद येथील डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीने (डीआरडीएल) 3-डी प्रिंटिंग प्रक्रियेचा वापर करून दरवाजा उघडणाऱ्या साधनाचा एक नमुना विकसित केला आहे.
जो थर्मोप्लास्टिक मटेरियलपासून बनवलेला असून या साधनाची नेटकेपणाने मांडणी केली आहे. ज्याचा उपयोग दरवाज्याची कडी, एटीएमचे कीपॅड किंवा दरवाजाचा गोलाकार ठोकळा उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा वारंवार स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श न करता ('टच-फ्री') उघडता यावे यासाठी हे साधन फायदेशीर ठरणार आहे.
या साधनाचा हुक सामान्य दरवाजाच्या हँडलच्या आकारांप्रमाणे तयार केला आहे. तर त्याच्या निमुळत्या टोकाचा वापर एटीएम कीपॅड, लिफ्टची बटणे आणि कीबोर्ड हाताळण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
त्याशिवाय जेव्हा हे साधन बंद केले जाईल तेव्हा या साधनात उपलब्ध असलेला पातळ थर या साधनाचा हुक स्वच्छ करू शकतो. ज्यामुळे हे साधन वारंवार वापरण्यास अनुकूल आणि स्वच्छ बनेल.
जंतुनाशक कागद..
कोची येथील डीआरडीओच्या नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक प्रयोगशाळेने पेपर निर्जंतुकीकरणाची रचना केली आहे. ज्याचा वापर सुरक्षा पास, पत्र, चलनी नोटांसारख्या कागदावर आधारित दैनंदिन वस्तूंच्या स्वच्छतेसाठी केला जाऊ शकतो.
या डिव्हाइसमध्ये दोन झाकणं आहेत, या दोन झाकणादरम्यान या कागदी वस्तू ठेवल्या जातात. विशेष थर्मल कापड वापरलेल्या हिटींग तारांचा वापर करून ही दोन्ही झाकणं गरम केली जातात.
अशाप्रकारे उष्णतेचा वापर करून कागदी वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. ज्याठिकाणी कागदी वस्तूंचा वारंवार वापर केला जातो अशा कार्यालयांमध्ये या साधनाचा वापर केला जाऊ शकतो.