ETV Bharat / opinion

कोविड-१९ : अमेरिकेच्या संशोधकांनी मांडली व्हेंटिलेटरच्या सामायिकीकरणाची नवीन संकल्पना.. - व्हेंटिलेटर

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याचा सामना करत असताना अमेरिकेतील एका संशोधक टीमने व्हेंटिलेटर्सच्या शेअरिंगची/ सामायिकीकरणाची कल्पना पुढे आणली आहे. यानुसार प्रत्येक रुग्णाला लागणारा ऑक्सिजन सामायिक व्हेंटिलेटरच्या व्हॉल्व्हमधून नियंत्रित केला जातो.

COVID-19: US Researchers suggest new approach for sharing ventilators
कोविड-१९ : अमेरिकेच्या संशोधकांनी मांडली व्हेंटिलेटरच्या सामायिकीकरणाची नवीन संकल्पना..
author img

By

Published : May 24, 2020, 4:59 PM IST

बोस्टन (अमेरिका) - भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश असलेल्या एका संशोधक टीमने रूग्णांमध्ये व्हेंटिलेटर शेअरिंग करण्याची अनोखी कल्पना पुढे आणली आहे. कोविड-१९ने त्रस्त रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असताना व्हेंटिलेटरचा अभाव असल्यास शेवटचा उपाय म्हणून या पर्यायाचा यशस्वीरीत्या उपयोग करता येईल, असा या टीमला विश्वास आहे.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील श्रीया श्रीनिवासन यांच्यासह संशोधकांनी नमूद केले की, जर मोठ्या संख्येने कोविड-१९ रूग्णांना तीव्र श्वसनाचा त्रास झाल्यास सामायिक व्हेंटिलेटर वापरण्याच्या कल्पनेवर बऱ्याच चर्चा झाल्या. यामध्ये ऑक्सिजनची मुख्य नळी विविध छोट्या शाखांमध्ये (नळ्यांमध्ये) विभाजित केली जाते. जेणेकरून दोन किंवा अधिक रुग्ण एकाच मशीनशी जोडले जाऊ शकतात असे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या श्रीनिवासन प्रमुख लेखिका आहेत. दरम्यान, प्रत्येक पेशंटला योग्य प्रमाणात आवश्यक तो ऑक्सिजन मिळण्याबाबत खात्री नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका संभवतो असे म्हणत अनेक डॉक्टरांच्या संघटनेने या पद्धतीला विरोध केला असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.

आता, एमआयटी आणि ब्रिघम आणि महिला हॉस्पिटलमधील एका पथकाने विभाजित व्हेंटिलेटरची आणखी एक कल्पना मांडली आहे ज्यामध्ये सुरक्षेच्या समस्येवर तोडगा निघू शकेल असे म्हटले आहे. यासंबंधित त्यांनी प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये त्याचा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे. परंतु तरीही आपत्कालीन परिस्थितीतच जेंव्हा एखाद्या रुग्णाचे आयुष्य धोक्यात असेल तेंव्हाच केवळ शेवटचा उपाय म्हणूनच या पद्धतीचा उपयोग केला जावा असे या पथकाचे म्हणणे आहे. “आम्हाला आशा आहे की जेंव्हा रुग्णाला व्हेंटिलेटरची खूप आवश्यकता असताना आणि उपचार केंद्रामध्ये उपकरणांचा अभाव असेल तेंव्हाच ही उपचार पद्धती कमी येईल," असे एमआयटीचे सहाय्यक प्राध्यापक जिओव्हानी ट्रॅव्हर्सो म्हणाले.

ट्रॅव्हर्सो म्हणाले, "आम्हाला याची जाणीव आहे की व्हेंटिलेटरचे सामायिकरण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही मात्र अगदीच शेवटचा पर्याय म्हणून या पद्धतीची शिफारस केली जाईल." तोंडाला किंवा नाकाला लावलेल्या ट्यूबद्वारे ऑक्सिजन देऊन लोकांना श्वास घेण्यास मदत करण्यासाठी व्हेंटिलेटर या मशीनचा वापर करण्यात येतो. कोविड-१९च्या उद्रेकानंतर पुरेसे व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी जगभरातील देशांनी धडपड केल्याचे संशोधकांनी सांगितले. एमआयटीच्या टीमने असे एक 'फ्लो व्हॉल्व्ह' विकसित केले की ज्यामुळे दोन किंवा अधिक रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असताना प्रत्येकाला मिळणार्‍या हवेचे प्रमाण नियंत्रित करता येईल. प्रत्येक रूग्णाच्या गरजेनुसार प्रवाहाचे नियंत्रण करण्यास हा 'फ्लो व्हॉल्व्ह' मदत करतो, असे श्रीनिवासन यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या रुग्णाची तब्येत अचानक किंवा हळूहळू सुधारत किंवा बिघडत असेल तर त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता या पद्धतीमध्ये आहे.

या सेटअपमध्ये प्रेशर रीलिझ व्हॉल्व्हदेखील समाविष्ट करण्यात आले आहेत. जेणेकरून एखाद्या रुग्णाच्या फुफ्फुसात आवश्यकतेपेक्षा जास्त वायू जाणार नाही. तसेच जर रुग्णाच्या श्वासोच्छवासाचा वेग बदलला तर सुरक्षिततेसाठी अलार्मची सुविधा देण्यात आली असल्याचे श्रीनिवासन म्हणाल्या. हा सेटअप तयार करताना रुग्णालयामध्ये सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. किंवा सेटअप उभा करण्यासाठी हार्डवेअर दुकानांमधून साहित्य आणून निर्जंतुक करून त्याचा वापर करता येईल.

सामान्यपणे एक व्हेंटिलेटर एकाच वेळी सहा ते आठ रूग्णांना पुरेसा हवेचा दाब पुरविण्यासाठी वापरता येऊ शकतो. मात्र सेटअपची गुंतागुंत टाळण्यासाठी दोनपेक्षा जास्त रुग्णांसाठी एक व्हेंटिलेटर वापरू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. सेटअपची चाचणी घेताना वायूप्रवाह विभाजित करण्यासाठी संशोधकांनी डुक्कर आणि कृत्रिम फुफ्फुसाचा वापर केला. कृत्रिम फुफ्फुस मानवी फुफुसाप्रमाणे कार्य करते. कृत्रिम फुफ्फुसांचे गुणधर्म बदलून, रुग्णांमध्ये उद्भवू शकणार्‍या बर्‍याच बदलत्या परिस्थितीचा विचार करून अनेक मॉडेल बनविण्यात संशोधक टीमला यश आले. एवढेच नाहीतर व्हेंटिलेटरमधील सेटिंग्ज बदलून प्रत्यक्ष नियंत्रण करणाऱ्याची गरज देखील टाळता येऊ शकते हे त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवले. एकाच व्हेंटिलेटरवर दोन प्राणी व्यवस्थित हवा घेऊ शकतात आणि दोघांना आवश्यक तेव्हढा हवेचा प्रवाह देखील राखू शकतात हे देखील संशोधकांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखवून दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.