ETV Bharat / opinion

कोरोनावरील लसीच्या शोधासाठी आता करण्यात येणार निरोगी लोकांचा अभ्यास

कोविड-१९चे गुढ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ सध्या तरुणांच्या डीएनएचा सिक्वेन्स तयार करत आहेत. कारण कोणत्याही मुलभूत वैद्यकिय अडचणींशिवाय निरोगी प्रौढांना आणि मुलांनाही ह्या गंभीर आजाराची लागण झाली आहे. तसेच कोरोना विषाणूच्या महामारीतून काही लोकांना गंभीर धोका पोहोचू शकतो. त्यामुळे सध्या संशोधक अशा लोकांचे अनुवांशिक दोष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

COVID-19 study looks at genetics of healthy people who develop severe illness
कोरोनावरील लसीच्या शोधासाठी आता करण्यात येणार निरोगी लोकांचा अभ्यास..
author img

By

Published : May 26, 2020, 10:26 PM IST

हैदराबाद : सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता जगभरातील विषाणू तज्ज्ञ या विषाणूला हरवण्यासाठी विविध मार्ग शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

कोविड-१९चे गुढ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ सध्या तरुणांच्या डीएनएचा सिक्वेन्स तयार करत आहेत. कारण कोणत्याही मुलभूत वैद्यकिय अडचणींशिवाय निरोगी प्रौढांना आणि मुलांनाही ह्या गंभीर आजाराची लागण झाली आहे. तसेच कोरोना विषाणूच्या महामारीतून काही लोकांना गंभीर धोका पोहचू शकतो. त्यामुळे सध्या संशोधक अशा लोकांचे अनुवांशिक दोष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सेंट लुई येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील मॅकडोनेल जीनोम इन्स्टिट्यूट ही तरुणांच्या डीएनए सिक्वेन्सचा अभ्यास करणारी संस्था आहे. ही संस्था या अभ्यासात भाग घेणार्‍या जगभरातील ३० हून अधिक जीनोम सीक्वेन्सिंग हबपैकी एक आहे. कोणत्याही मुलभूत वैद्यकिय आजार नसणाऱ्या निरोगी प्रौढांना आणि मुलांनाही कोविड-१९ सारखा गंभीर आजाराचे संक्रमण झाले आहे. पण कोरोना विषाणूच्या वारंवार संपर्कात येऊनही जे लोक कधीही संसर्गग्रस्त झाले नाहीत अशा लोकांवर हे संशोधक अभ्यास करणार आहेत. कोविड-१९ विषाणूला सखोल समजून घेतल्यावरच या आजारावर नवीन प्रकारची उपचारात्मक रणनीती आखली जाऊ शकते.

त्यासाठी वारंवार कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊनही आणि कोविड-१९ला कारणीभूत असणाऱ्या सार्स-सीओव्ही-२ या विषाणूची लागण न झालेल्या लोकांचा अभ्यास करण्याची योजना संशोधकांनी आखली आहे.

विषाणूची लागण न झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुवांशिक विविधता असू शकते, ज्यामुळे त्यांना कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही. कोविड-१९ला सखोल समजून घेताना मिळालेले ज्ञान, असामान्य संवेदन क्षमता आणि प्रतिकारक शक्ती यांसारख्या पैलूचा वापर करुनच या रोगावर नवीन उपचारात्मक धोरण तयार करता येऊ शकते.

या संशोधनाचे नेतृत्व वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संधिवात तज्ज्ञ आणि बाल रोगशास्त्रातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मेगन ए. कूपर करत आहेत. या प्रकल्पाचे नाव 'कोविड ह्यूमन जेनेटिक एफर्ट' असून हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (एनआयएच) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‌ॅलर्जी अ‌ॅण्ड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम केले जाणार आहे.

सार्स-सीओव्ही-2 या गंभीर विषाणुची लागण झालेले रुग्ण हे आमच्या अभ्यासाचे पहिले लक्ष्य असतील. ज्यांना अतिदक्षतेची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ५० वर्षापेक्षा कमी वय असणारे आणि निरोगी दिसणारे लोकंही आमचे पहिले लक्ष्य असतील, असे कूपर यांनी सांगितले. ज्या सेंट लुइस येथील क्लिनिकल इम्युनोलॉजी प्रोग्राम आणि जेफ्री मॉडल डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर फॉर प्राइमरी इम्युनोडेफिशियन्सीचे नेतृत्वही त्या करतात.

“या रूग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसांचा जुनाट आजार किंवा आम्हाला माहित असलेली कोणतीही इतर परिस्थिती जी कोविड-१९शी गुंतागुंत होण्याचा धोका वाढवते,” असे त्या म्हणाल्या. “उदाहरणार्थ, आपण कधीकधी मॅरेथॉन धावपटू, एखादा तंदुरुस्त व्यक्ती किंवा निरोगी व्यक्ती या विषाणूमुळे खूप आजारी पडलेल्या किंवा काही निरोगी मुले जी कोविड-१९ विषाणुमुळे गंभीर आजारी पडल्याचा कथा आपण एकतो. हाच रुग्णाचा प्रकार आम्हाला या अभ्यासासाठी आवश्यक आहेत. सध्या हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या रूग्णांमध्ये अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असू शकेल, जे बहुदा १० टक्क्यांपेक्षा कमी असेल. ”

अशा रुग्णांच्या अनुवांशिकतेमुळे शरीराला विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या रोगप्रतिकारक मार्गांचा खुलासा होऊ शकतो. त्या अभ्यासातुन समोर आलेल्या माहितीमुळे अनुवांशिक संवेदनशीलता नसणाऱ्या रुग्णाला मदत होऊ शकते. त्याचबरोबर मधुमेह किंवा हृदयविकारासारख्या उच्च धोकादायक परिस्थितींमध्ये देखील हा प्रकल्प फायदेशीर ठरु शकतो.

“आमच्या रोगप्रतिकारक शक्तींनी यापूर्वी अशाप्रकारचा विषाणू कधीच पाहिला नव्हता." असे कूपर म्हणाल्या. “सध्या जगभरात कोविड-१९मुळे अनेक प्रकारची गुंतागुंत होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. हे संसर्ग खरोखर नियंत्रित करणारे अनुवांशिक घटक आणि रोगप्रतिकारक शक्ती घटकांच्या तपासणीसाठी जागतिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.” असेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.