ETV Bharat / opinion

कोरोना महामारी आणि विविध ज्ञानकौशल्याने समृद्घ मानवी भांडवल

author img

By

Published : Oct 17, 2020, 3:05 PM IST

कोविड-19 ने संपूर्ण मार्केटिंग कार्यपद्धतीला नव्याने परिभाषित केले आहे. कोविडपूर्व स्थितीत, मार्केटिंग कार्यपद्धती म्हणजे विक्री, जाहिरात, ब्रँडिंग आणि मार्केटिंग संशोधन यासारख्या गोष्टी हाताळणे इतकेच होते. सध्याच्या घडीला सुरू असलेल्या महामारीमुळे विक्री व्यवस्थापकाच्या कामाच्या स्वरूपाचा संपूर्ण कायापालट झाला आहे.

मानवी भांडवल
मानवी भांडवल

सध्या सुरू असलेल्या कोविड-19 संकटात, व्यवसायांना आपल्या मर्यादित मानवी भांडवलाकडून अनेक परिणामांची अपेक्षा आहे. असंख्य समयोचित परिणाम देण्यासाठी, त्यांनी विविध प्रकारच्या ज्ञान कौशल्यांचा संच प्राप्त करून घेतला पाहिजे. आता आपण शिक्षण व्यवसायाचे उदाहरण घेऊ या. कोविडपूर्व स्थितीत, शिकवणे हाच एकमेव बहुसंख्य संस्थांमध्ये महत्वपूर्ण उपक्रम म्हणून परिचित होता.

सध्याच्या घडीला असलेल्या पेचप्रसंगामुळे, अनेक संस्था शिकवण्याशिवाय अनेक परिणामांची अपेक्षा बाळगून आहेत. आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक राष्ट्रीय(एनआयआरएफ) आणि आंतरराष्ट्रीय(क्यूएस- वर्ल्ड) मानांकन साध्य करण्याबरोबरच महसुलाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टिने सल्लागार, संशोधक, प्रशिक्षक, निधी जमा करण्यास सहाय्य करणारे सहाय्यक होण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, ते शिकवण्याचे डिजिटल रूपांतरण करण्यात मुख्य भूमिका निभावत आहेत.

गेल्या सहा महिन्यात विविध प्रकारचे तंत्रज्ञान शिकून शिक्षक हे आभासी शिक्षक बनले आहेत. अनेक प्रकारचे कौशल्य संच प्राप्त करण्यासाठी गेल्या सहा महिन्यात शिक्षक समुदायाचा शिकण्याचा आलेख हा मोठा आश्चर्यकारक आहे आणि सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक यासाठी खरोखर प्रशंसनीय आहेत. आता व्यवस्थापन व्यवसायाच्या क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाकडे पाहू या. सर्व प्रकारची कामे करणाऱ्या व्यवस्थापन व्यावसायिकांकडून कंपन्यांच्या अपेक्षांची मागणी सर्वोच्च टोकाला गेली आहे. कोविड-१९ मुळे, कंपन्या मर्यादित निधीमध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची भरती करून खर्च वाचवण्यास उत्सुक आहेत.

कोविडपूर्व स्थितीच्या तुलनेत, वित्त क्षेत्रात डिजिटल परिवर्तन अत्यंत वेगाने होत आहे. आता वित्त आणि लेखा क्षेत्रातील व्यावसायिक एम एस एक्सेल, पॉवर बीआय, एसएपी- ईआरपी, एसक्यूएल डेटाबेस, व्हर्च्युअल ऑडिट्स आणि डेटा अनालिटिक्स सॉफ्टवेअर पायथन आदी विविध तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचे कौशल्य उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. या कौशल्य उंचावण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांना उभरत्या फिन टेक क्षेत्रात चपखल बसता येईल. त्याचप्रमाणे, वरील आयटी व्यावसायिक हे पीटुपी कर्ज, खुली बँकिंग, ब्लॉक चेन आणि वित्तीय संशोधन यांसारख्या उभरत्या क्षेत्रांमधील फिन टेक समस्यांवर तोडगे शोधण्यासाठी वित्त आणि बँकिंगची प्राथमिक तत्वे शिकण्यास उत्सुक आहेत.

आणखी,मनुष्यबळ विकासाचे कार्य हे कोणत्याही व्यवसायात मानवी भांडवलाचे व्यवस्थापन मानले जाते. त्यांचे प्राथमिक काम हे योग्य प्रतिभा ओळखणे (निवड आणि भरती), आवश्यक प्रशिक्षण देणे (शिकणे आणि विकास), कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये, म्हणून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे(फीडबॅक) आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढती देणे हे असते. आणखी पुढे, कामाची रचना, कामाचे विश्लेषण, कामाचे आवर्तन, भरपाई वेतन, कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या योजना, बढत्या, तक्रारींचे नियंत्रण आणि संघर्षांवर तोडगा काढणे यातही ते गुंतलेले असतात. शिवाय, ते रोजच मानवी भांडवलाला सामोरे जात असल्याने त्यांना वर्तनात्मक अभ्यास, मानसशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, संपर्क आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता तंत्रज्ञान यांचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तसेच, मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची भूमिका ही कंपनीची संस्कृती स्थापित करण्यात अत्यंत महत्वाची असते. कोविड-१९ ने कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले आहे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत दमवणारे काम आहे. त्यामुळे, मनुष्यबळ व्यवस्थापक ऑनलाईन लेखी परिक्षा, आभासी समूहचर्चा, आभासी मुलाखती आणि समाजमाध्यमी वेबसाईट्सवर सामाजिक वर्तन निश्चित करणे, असे नवीन कौशल्याचे संच प्राप्त करून घेत आहेत.

अर्थात, भरती करताना ते व्यापक जोखीम पत्करत आहेत, कारण चरित्र, प्रवृत्ती किंवा स्वभाव आणि वर्तन अशा वैयक्तिक गुणांची पारख ते आभासी मंचांवरून अचूकपणे करण्यास कदाचित समर्थ ठरणार नाहीत. कोविड-19 ने याहीपुढे मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची भूमिका कर्मचाऱ्यांच्या तणावसंबंधी मुद्दे आणि कामाच्या तणावामुळे कर्मचारी कोलमडून पडले तर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी समुपदेशकापर्यंत विस्तारली आहे.

त्याचप्रमाणे, कोविड-19 ने संपूर्ण मार्केटिंग कार्यपद्धतीला नव्याने परिभाषित केले आहे. कोविडपूर्व स्थितीत, मार्केटिंग कार्यपद्धती म्हणजे विक्री, जाहिरात, ब्रँडिंग आणि मार्केटिंग संशोधन यासारख्या गोष्टी हाताळणे इतकेच होते. सध्याच्या घडीला सुरू असलेल्या महामारीमुळे विक्री व्यवस्थापकाच्या कामाच्या स्वरूपाचा संपूर्ण कायापालट झाला आहे. महामारीने वैयक्तिक विक्री थांबवली आहे. जाहिरात व्यवस्थापक पे पर क्लिक सारख्या (पीपीसी) डिजिटल पद्धतीच्या जाहिरातींबाबत धोरणे नव्याने परिभाषित करू लागले आहेत.

तसेच अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससारख्या चॅनल्सवरून ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटीवरील जाहिरातींकडेही पहाता येईल. त्यामुळे, मार्केटिंग कार्यपद्धती ही डिजिटल मार्केटिंगमध्ये परिवर्तित होत असून जेथे तंत्रज्ञान हेच आघाडीवर आणि या कार्यपद्धतीला मार्गदर्शन करत आहे. म्हणून मार्केटिंग व्यवस्थापकांना वेब डिझाईन, समाजमाध्यमांचे व्यवस्थापन, गुगल अडवर्ल्ड्स, एसईओ( सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन), प्रोग्रॅमिंग आणि मजकुराचे लेखन अशी आधुनिक डिजिटल मार्केटिंग कौशल्ये शिकून घेण्याची गरज आहे.

कोविड-19 नवीन उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवस्थापन कार्यपद्धतीमध्ये अत्यंत वेगवान पद्धतीने परिवर्तन घडवत आहे. देशातील आयआयटी आणि विद्यापीठे सर्व शाखांमध्ये जसे की अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवता आणि समाजविज्ञान ज्ञानशाखांमध्ये अभ्यासक्रम सुरू करत आहेत. व्यावसायिकांच्या भविष्यातील गरजांसाठी मानवी भांडवलाला प्रशिक्षित करण्यासाठी कोणताही विषय वर्ज्य न करता आणि अनेक शाखांचे अभ्यासक्रम सहयोगाने सानुकूलि(कस्टमाईझ)करण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी, देशातील व्यावसायिक शिक्षण संस्थांनी तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांशी सहयोग करार करून तंत्रज्ञान स्नेही व्यवस्थापक तयार केले पाहिजेत.

अंतिमतः समारोप करायचा तर, मानवी भांडवलाने सध्याच्या पेचप्रसंगात अस्तित्व टिकवून धरायचे असेल तर अनेक शाखांमधील कौशल्यांचा संच प्राप्त करणे आवश्यक आहे.

लेखक - एम चंद्रशेखर, सहाय्यक प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राईज, हैदराबाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.