हैदराबाद : कोरोना विषाणूमुळे जगाभरातील १० दशलक्ष मुलांना तीव्र अन्न टंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आधीच कुपोषणासारख्या जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या मुलांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (डब्ल्यूएफपी) व्यक्त केला आहे.
अगोदरच खराब पालनपोषणामुळे कमकुवत होत चाललेल्या लहान शरीरावर या विषाणूचा आता दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी दुसरीकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या असुरक्षित कुटुंबांसाठी तर कोरोना महामारी म्हणजे अत्यंत त्रासदायक आणि जीवघेणी गोष्ट ठरत आहे.
कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात जारी केलेले लॉकडाउन आणि हालचालींवर घातलेले निर्बंध उदरनिर्वाहाच्या दृष्टीकोनातून गरिब कुटुंबांसाठी अपायकारक ठरत आहेत. एकीकडे कमकुवत आरोग्य व्यवस्था आणि दुसरीकडे कोरोना विषाणूचा वाढता धोका यामुळे जगातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. याचा परिणाम विशेषतः गरीब राष्ट्रांतील पौष्टिक आहार न मिळणाऱ्या गरीब कुटुंबांवर होत आहे.
“आता जर आपण करण्यात कृती करण्यास अयशस्वी झालो, तर आपल्याला भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्याच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. आज ज्याप्रकारचे अन्न मिळत आहे त्यावरुन कोविड-१९ चा मुलांवर होणारा परिणाम कित्येक महिने, वर्षे किंवा दशकांपर्यंत जाणवेल हे सुनिश्चित होईल,” असे मत डब्ल्यूएफपीच्या न्यूट्रिशन डायरेक्टर लॉरेन लँडिस यांनी व्यक्त केले.
या वर्षाच्या ग्लोबल न्यूट्रिशन अहवालात पौष्टिक तत्त्वातील असणारी असमानता अधोरेखित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अत्यंत गरीब समुदाय खुंटीत राहिला आहे. यामध्ये कोरोना विषाणूला आणि सामजिक-आर्थिक अपयाशाला सर्वात अगोदर विशेषतः पाच वर्षांखालील मुले बळी पडण्याचा धोका आहे. अपुऱ्या अन्न सेवनामुळे किंवा आजारपणामुळे किंवा दोन्हींमुळे तीव्र कुपोषणाचा आजार फैलावतो. याचा परिणाम म्हणुन अचानक वजन कमी होते. यावर जर लवकरात लवकर उपचार घेतले नाहीत तर परिणामी मृत्यूही ओढावू शकतो.
डब्ल्यूएफपीच्या अंदाजानुसार असे दिसून आले आहे की, अन्न सुरक्षेवर कोविड-१९च्या सामाजिक-आर्थिक परिणामामुळे पाच वर्षांखालील मुलांच्या तीव्र कुपोषणात २० टक्क्यांची वाढ होऊ शकते. हा आकडा केवळ अन्न असुरक्षिततेचा परिणामाचा आहे. आरोग्य सुविधा बंद झाली तर कुपोषणाच्या परिणामात आणखी वाढ होईल.