ETV Bharat / opinion

Himachal Pradesh Election 2022 : 'भाजप इतिहास रचणार की काँग्रेस आश्चर्यचकित करणार', एक विश्लेषण - or Congress will surprise

हिमाचल प्रदेश निवडणूकीचे (Himachal Pradesh Election) मतदान पार पडले. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत (Fight between BJP and Congress) आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) सुरुवातीला लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर आपने हा प्रयत्न सोडून दिला. काँग्रेसच्यावतीने प्रियांका आणि सचिन पायलट यांनी प्रचारात आघाडी घेतली. आणि भाजपचे स्टार प्रचारक खुद्द पंतप्रधान मोदी होते. हिमाचलमध्ये भाजप इतिहास रचनार (BJP will make history ) की काँग्रेस चकित करनार ( or Congress will surprise) हे पाहावे लागेल. ज्येष्ठ पत्रकार संजय कपूर यांचे विश्लेषण (an analysis).

Himachal Pradesh Election
हिमाचल प्रदेश निवडणूक
author img

By

Published : Nov 14, 2022, 1:47 PM IST

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेश निवडणूकीचे (Himachal Pradesh Election) मतदान पार पडले. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत (Fight between BJP and Congress) आहे. भाजप सत्तेत आहे. निवडणूक विश्लेषकांच्या मते भाजपसमोर कडवे आव्हान आहे. मात्र, भाजपला निवडणुका कशा जिंकायच्या हे माहीत आहे. भाजपने अशा अनेक निवडणुका जिंकल्या आहेत, ज्याठिकाणी भाजपने जागा हरल्या होत्या. असे असले तरी सत्ताधाऱ्यांमध्ये एक विचित्र 'अस्वस्थता' नक्कीच पाहायला मिळत आहे.

पक्षाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची जबाबदारी स्वीकारताच नवी गती मिळाली. राज्य सरकारच्या विरोधात वाढलेली सत्ताविरोधी लाट आणि तिकीट वाटपाबाबत तीव्र नाराजी पाहून पंतप्रधान मोदींनी पक्षाचे झालेले नुकसान कमी करण्याचा निर्णय घेतला. सोलन येथील भाषणादरम्यान ते म्हणाले होते की, राज्यातील जनतेने उमेदवाराकडे दुर्लक्ष करून फक्त 'कमळ' निवडणूक चिन्ह लक्षात ठेवावे आणि 'मोदीजी तुमच्याकडे आले आहेत' असा विश्वास ठेवावा.

2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजप पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यावर खूप अवलंबून आहे, परंतु मतदारांनी कोणाला निवडून दिले हे अप्रासंगिक असल्याचे सुचवून, विधान स्वतःच खूप संदेश देत आहे. एकप्रकारे त्यांनी हा संदेश दिला की जो जिंकेल, त्याचा निर्णय त्याच्या हातात आहे.

पण पंतप्रधानांना हे का म्हणावे लागले हा वादाचा प्रश्न आहे. उमेदवारांकडे दुर्लक्ष करण्याबाबतही ते का बोलले? यामागे काही सर्वेक्षण अहवाल आहे का? किंबहुना, काही सर्वेक्षणांमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढत असल्याचे वर्णन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि पक्ष दोघेही आपली ऊर्जा गमावत असल्याचा दावाही सर्वेक्षणात करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे दोघेही येथूनच आले आहेत, हेही येथे महत्त्वाचे आहे. खुद्द पंतप्रधानांनी येथे बराच काळ घालवलेला आहे. त्यांना येथील राजकारणात प्रचंड रस आहे.

या राज्यात ‘उच्च’ जातीचे ‘वर्चस्व’ राहिले आहे. पक्षाने आपला हिंदू पाया मजबूत करण्याबाबतही वक्तव्य केले आहे. उत्तराखंड प्रमाणेच, पक्षाने सत्तेत आल्यावर राज्यात समान नागरी कायददा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. युसीसी हा इथे मोठा मुद्दा नाही, पण पक्ष नेतृत्वाला असे वाटते की, अशा हालचालीमुळे आपली हिंदुत्व प्रतिमा मजबूत होईल. मंदिरांसंदर्भातील प्रत्येक कार्यक्रमाची पूर्ण प्रसिद्धी पक्षातर्फे केला जाते. मंदिरांना भेटी देताना, प्रतिमा अशा प्रकारे तयार केली जाते की पक्ष हा हिंदूंचा 'संरक्षक' आहे असा संदेश जातो.

पक्ष नेतृत्वाला आशा आहे की हे मुद्दे उपस्थित केल्याने वाढत्या किमती, नोकऱ्यांचे नुकसान आणि लोकप्रियतेत होणारी घट भरून निघेल. खरे तर, अर्थव्यवस्थेचा मागोवा घेणाऱ्या एका एजन्सीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये बेरोजगारी इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. दोन वर्षांहून अधिक काळ संरक्षण दलात तरुणांची भरती करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. हे त्याचे एक कारण आहे. दरवर्षी सुमारे 5000 तरुण सैन्यात भरती होतात, याचा अर्थ सुमारे 10,000 जणांना संरक्षण दलात नोकरी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीआयएसएफ आणि निमलष्करी दलातील भरतीवरही बंदी आहे, त्यामुळे तरुण जाणार कुठे असा प्रश्न आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षही यावेळी ‘मंदिर दर्शन’च्या राजकारणातून सुटू शकला नाही. तरीही प्रियांका गांधी यांनी नोकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. अनेक पक्षांनी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेवर जोमाने आवाज उठवला. साहजिकच याचा परिणाम झालेल्यांनी या विषयांशी सहमती दर्शवली. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मुद्दा खूपच भावनिक ठरला आहे. राज्यात सुमारे अडीच लाख सेवानिवृत्त आणि सुमारे दोन लाख सेवारत कर्मचारी आहेत. 55 लाखांच्या छोट्या मतदारसंघात हे कर्मचारी आणि त्यांच्या मागण्यांचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. तसे, असे म्हटले जात आहे की प्रत्येक घरातील काही सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये काम करतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य निश्चितपणे सरकारी योजनांचा लाभ घेतात.

यामुळेच जुन्या पेन्शन योजनेची मागणी लोकांमध्ये जोर धरू लागली. आपल्या मागणीला वेग आला तेव्हा भाजपने 'बचावात्मक' भुमिका स्वीकारली. विशेष म्हणजे, राज्य सरकारचा दावा आहे की त्यांनी कोविड-19 साथीच्या आजाराविरूद्ध राज्यातील लोकसंख्येला मोफत लसीकरण देण्याचे मोठे काम केले, परंतु लोक वेगळे काही मानतात. गेल्या दोन वर्षांत हिमाचलमधील पर्यटनावर परिणाम झाला आहे. हॉटेल्स बंद आहेत. तसे, साथीच्या रोगानंतर कर परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे, परंतु तरीही प्री-कोविड पातळी गाठलेली नाही.

पंजाब निवडणुकीनंतर 'आप' या निवडणूकीत तिरंगी लढत करू शकेल अशी सर्वांना अपेक्षा होती. सुरुवातीला त्यांनी तशी घोषणाही केली होती. त्यामुळे येथिल निवडणूक तीरंगी होईल अशी अपेक्षा बळावली होती. मात्र नंतर अचानक आप निवडणूक मैदानावरुन गायब झाल्याचे पहायला मिळाले. मात्र याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो हे पहावे लागेल.

विधानसभेच्या 68 जागांसाठी सुमारे 400 उमेदवारांनी निवडणूक लढवली असले तरी भाजपची थेट काँग्रेसशी लढत झाली. काँग्रेसकडून प्रियांका गांधी वड्रा आणि सचिन पायलट यांनी आघाडी घेतल्याचे पहायला मिळाले. त्यांना आशा आहे की जनता त्यांना साथ देईल आणि काँग्रेस सरकार स्थापन करेल. प्रियांकाच्या रॅलींमध्येही चांगली गर्दी पाहायला मिळाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रियंकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल सुरुच ठेवला. प्रचारक म्हणून त्यांची प्रतिष्ठा आता हिमाचल प्रदेशात पक्षाची कामगिरी कशी आहे यावर अवलंबून आहे. बंधू राहुल गांधी 3,700 किमीच्या भारत जोडी यात्रेत (BJY) असल्यामुळे यांच्या अनुपस्थितीत प्रचाराचा भार उचलला होता.

अनेक मतदारांना खरोखरच गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे राहुल यांनी राज्य सोडण्याचा निर्णय का घेतला? हिमाचल प्रदेशातील त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणाऱ्या एका सर्वेक्षणकर्त्याच्या मते, भारत जोडो यात्रेमुळे हिमाचलमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. तसेच, नवनिर्वाचित पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यांनी प्रचाराचे नेतृत्व करणारे सामूहिक नेतृत्व असल्याचे सुनिश्चित केले आहे. यात आनंद शर्मा यांच्यासारख्या नाराज काँग्रेस नेत्यांचा पक्षातून बाहेर पडून प्रचाराचा समावेश आहे. शिमल्यात उलथापालथ होण्याची शक्यता असूनही, जनमत चाचण्या आणि विरोधी पक्षांमध्ये उत्साह असूनही, भाजप सध्याची उदाहरणे आणि काही मतदारांच्या आशा उलटवू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.