LIVE : शिवसेना आमदार अपात्र निकाल लाईव्ह - आमदार अपात्रता प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 10, 2024, 5:12 PM IST
|Updated : Jan 10, 2024, 6:54 PM IST
मुंबई : शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की, उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली. तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. विधानसभा अध्यक्ष आज निकाल देत आहेत.