ETV Bharat / lifestyle

Tips for Your Childrens Future Investment : मुलांच्या भविष्याकरिता गुंतवणूक कशी करावी, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स - Tips for Your Childrens Future Investment

आपल्या सर्वांना माहीत आहे की, मुलांना भेटवस्तू देणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र, मुलांचे चांगले भविष्य ( Best future plan for children ) सुनिश्चित करण्यासाठी त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान ( investment for child future ) करणे पालकांचे नैतिक कर्तव्य असते. यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. तरच मुलांचे भविष्य सुरक्षित ( Financial security for your children ) राहणे आवश्यक आहे.

Childrens Future Investment
Childrens Future Investment
author img

By

Published : Dec 21, 2021, 3:00 AM IST

हैदराबाद- मुलांच्या भविष्याची चिंता ( Financial security for your children ) तुम्हा सतावते का ? खरे पाहिले तर, कष्टाचे पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे हे जाणून घेणे, ही एक मोठी कसरत असते. पालक आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ( plan for children future ) खूप प्रयत्न करतात. परंतु त्यांच्यापैकी अनेकांना आर्थिक नियोजनाची माहिती ( investment for child future) नसते. तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी नियोजन करणे कधीही घाईचे नसते.

आजच्या परिस्थितीत, कोणत्याही अनपेक्षित घटना आणि अभूतपूर्व परिस्थितीत टिकून राहण्यासाठी तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे ( Plan wisely for your childrens future ) महत्त्वाचे आहे. बहुतेक पालक आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी गुंतवणूकदार सल्लागारांवर अवलंबून असतात.

हेही वाचा-Income Tax : केंद्र सरकारकडून आयकर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ

प्रत्येक पालकाची आपल्या मुलांसाठी परिपूर्ण जीवन सुनिश्चित करण्याची कल्पना कमी-अधिक प्रमाणात सारखीच असते. पालक हे मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यास तयार असतात. कारण त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम गोष्टी हव्या आहेत. जसे की - उच्च शिक्षण, लग्न किंवा नवीन घर खरेदी करणे. तथापि, यासाठी केवळ कल्पना करणे पुरेसे नाही. त्यासाठी आपल्या कल्पनांचे रुपांतर व्यवहारीक कृती योजनेत झाले पाहिजे.

हेही वाचा-TIPS FOR CAR INSURENCE POLICY : सर्वोत्तम कार विमा पॉलिसी कशी निवडावी

आपल्या सर्वांना माहीत आहे की, मुलांना भेटवस्तू देणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र, मुलांचे चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे पालकांचे नैतिक कर्तव्य असते. यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. तरच मुलांचे भविष्य सुरक्षित राहणे आवश्यक आहे.

इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र तयार करण्याचे महत्त्व -

नवीन संपत्ती निर्माण करणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय एखाद्याच्या कायदेशीर वारसांना संपत्ती हस्तांतरित करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने इच्छापत्र लिहिणे उचित आहे. मृत्युपत्र हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यामध्ये एखाद्याच्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाकडे हस्तांतरित करावी, याबाबत सांगितलेले असते. बहुतेक लोक मृत्युपत्रात त्यांच्या जोडीदाराची आणि मुलांची नावे नमूद करतात. काही लोक त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना काही मालमत्ता वाटप करून मृत्यूपत्र करतात. इच्छापत्र लिहून त्याची नोंदणी करून तुम्ही कुटुंबातील सदस्यांमधील भविष्यातील वाद टाळू शकता. लक्षात ठेवा की एखादी व्यक्ती मुलाला देऊ शकणारी पहिली आर्थिक भेट म्हणजे इच्छापत्र असते.

मुलांकरिता आरोग्य विमा ( health insurance for children )

मुलाच्या जन्मानंतर लगेचच संपूर्ण फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी घेणे चांगले आहे. कारण वैद्यकीय खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आरोग्य विम्याशिवाय हे खर्च उचलणे कठीण आहे. आरोग्य विमा नसताना अनपेक्षित आजार झाल्यास चांगले उपचार देण्यात अडचणी निर्माण होतात. पॉलिसी कमी वयात घेतल्यास, वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते.

आर्थिक निर्णय घेताना मुलांनाही सहभागी करा-

आर्थिक निर्णय घेताना, मुलांशी चर्चा करा. विम्याचा कसा परिणाम होईल याबद्दल मुलांशी चर्चा करणे, ही चांगली बाब ठरते. मुलांना आर्थिक बाबतीत स्वतःचा विचार करण्यास प्रवृत्त करा. वैयक्तिक आर्थिक योजना कशा तयार केल्या पाहिजेत? ते सर्व फायदे समजू शकतात. मालमत्ता आणि जबाबदारी जाणून घेणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर असते. या सर्वांची त्यांना जाणीव असल्याने काही अनपेक्षित घडले की घाबरण्याची गरज राहत नाही. मुलांना आर्थिक बाबतीत भागीदार बनविल्याने त्यांना वस्तुस्थितीची स्पष्ट कल्पना येते.

हेही वाचा-Jaya Bachchans Curse : माझा शाप आहे, तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत- संसदेत जया बच्चन यांचा भाजवर हल्ला

मुलांना कर्जमुक्त जीवन द्या ( debt free life to children )

कर्ज ही एक जबाबदारी आहे. ते मुलांना हस्तांतरित केले जाऊ नये. त्यामुळे त्यांचा विकास खुंटेल. जेव्हाही नवीन कर्ज घेतले जाते तेव्हा ते फेडण्यासाठी बॅकअप योजना असावी. त्यासाठी पैसे वाटप करणे किंवा कर्ज कव्हर टर्म पॉलिसी घेणे आवश्यक आहे. या विमा पॉलिसींमध्ये कोणाची तरी देणी असलेली सर्व कर्जे समाविष्ट असतात. कर्ज घेतल्यावर ते वेळेवर फेडलेच पाहिजे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे योग्य नाही. तुम्ही जेव्हा मुलांच्या डोक्यावर कर्ज नसलेले पाहता, तेव्हा ते तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढवण्याचा प्रयत्न करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.