ETV Bharat / lifestyle

जागतिक मानसिक आरोग्य दिन: कोरोना महामारीत लोकांमध्ये चिंतेचे वाढते प्रमाण - tips for mental health

कोरोनाच्या संकटात प्रौढ आणि मुलांमध्ये चिंता आणि भीतीचे प्रमाण वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगसारख्या उपाययोजनांमुळे लोकांना एकटे पडल्यासारखे वाटू शकते. एकटेपणामुळे चिंता आणि तणाव निर्माण होतो, असे केआयएमएस रुग्णालयाचे डॉ. चरण तेजा ( न्यूरोसायक्ट्रिस्ट) यांनी सांगितले.

जागतिक मानसिक आरोग्य दिन
जागतिक मानसिक आरोग्य दिन
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:22 PM IST

हैदराबाद - कोरोना महामारीत जागतिक मानसिक आरोग्य दिन आज साजरा केला जात आहे. या महामारीत मानसिक आरोग्याच्या जनतेमध्ये समस्या वाढत आहेत. प्रत्यक्षात सोप्या पद्धतीने भीती आणि चिंतेवर मात करणे शक्य असल्याचा तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटात प्रौढ आणि मुलांमध्ये चिंता आणि भीतीचे प्रमाण वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगसारख्या उपाययोजनांमुळे लोकांना एकटे पडल्यासारखे वाटू शकते. एकटेपणामुळे चिंता आणि तणाव निर्माण होतो, असे केआयएमएस रुग्णालयाचे डॉ. चरण तेजा ( न्यूरोसायक्ट्रिस्ट) यांनी सांगितले. पुढे डॉक्टर तेजा म्हणाले, की अनेकांमध्ये स्वत:चे आणि जवळच्या व्यक्तींच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण झाल्याची दिसून आले. तसेच आर्थिक स्थिती आणि नोकरी, खाण्याच्या बदललेल्या पद्धती, झोपेच्या समस्या अशा विविध अडचणींना अनेकजण सामोरे जात आहेत. अशा ताणामधून तंबाखू सेवनासह दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

असे ठेवा चांगले मानसिक आरोग्य

  • काम केल्यानंतर तुमच्या शरीराला विश्रांती द्या.
  • दीर्घ श्वास, ध्यान, हात-पाय धुणे अथवा आवडणारे छंद जोपासणे अशा गोष्टी करा.
  • तणाव निर्माण होणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.
  • चांगला आहार, संगीत ऐकणे, वाचणे, कुटुंबाशी बोलणे या गोष्टी करा.
  • तुम्हाला ज्या भावना वाटतात, त्या जवळच्या अथवा मित्रांबरोबर व्यक्त करा.
  • योग्य प्रमाणात पाणी घ्या. जादा प्रमाणात कॅफिन आणि दारू पिण्याचे टाळा. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.