नवी दिल्ली - Vivo V15 Pro भारतात लाँच करण्यात आलेला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील बाजूस व्हिवो वी १५ प्रोमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो AI (कृत्रिम बुद्धीमत्ता) नी युक्त आहे.
या फोनची किंमत भारतात २८,९९० आहे, असे समजते. ही किंमत 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. या फोनला अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, स्नॅपडील आणि व्हिवो इंडियावरुन ६ मार्चपासून खरेदी करता येणार आहे. फोनची प्री-ऑर्डर बुकिंग आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.
Vivo V15 Pro ची वैशिष्ट्ये
- 19.5:9 आस्पेक्ट रेशियो
- अल्ट्रा फुलव्यू डिस्प्ले पॅनल
- 5th जनरेशन फोन
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
- ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 एआयई प्रोसेसर
- टोपाज ब्लू आणि रूबी रेड रंगामध्ये उपलब्ध
- पॉप अप सेल्फी कॅमरा
- डुअल सिम (नॅनो)
- अँड्राईड 9.0 पाई , फनटच ओएस 9
- 6.39 इंचीचा फुल एचडी + (1080x2340 पिक्सेल)
- सुपर अमोलेड पॅनल
- 6 जीबी रॅम
- ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
- 48 मेगापिक्सलचा प्रायमरी क्वाड पिक्सेल सेंसर
- एफ/1.8 अपर्चर लेन्स
- 8 मेगापिक्सेलचा एआय सुपर वाईड सेंसर आणि 5 मेगापिक्सेलचे डेप्थ सेंसर
- रिअर कॅमेऱ्यामध्ये एआय बॉडी शेपिंग
- एआय पोर्टेट लाईटनिंग
- सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेल सेंसर
- इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी (२५६ जीबीचा मायक्रोएसडी कार्ड वापरुन करता येणार मेमोरी एक्सटेंड)
- 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक
- एक्सेलेरोमीटर, अम्बियंट लाईट सेंसर
- डिजिटल कंपास
- जायरोस्कोप
- प्रॉक्सिमिटी सेंसर
- 3,700 एमएएच बॅटरी
- डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्ट
- हॅन्डसेटचे डायमेंशन 157.25x74.71x8.21 मिलीमीटर
- वजन 185 ग्राम
