टेक डेस्क - वनप्लस सीरिजच्या प्रत्येक फ्लॅगशीपला भारतीय ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आता मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार कंपनी नवीन फ्लॅगशीप वनप्लस ९ सिरीज ५G '२३ मार्च'ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार या सीरिजमध्ये ५० वॉटचे वायरलेस चार्जिंग सपोर्ट असणार आहे.
गिझचायना (Gizchina) या चिनी टेक पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार वनप्लस ९ सीरिजची टॉप ऑफ द लाइन फ्लॅगशीप ५० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
यापूर्वी वनप्लस ८ प्रो या मॉडलमध्ये ३० वॉट वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार कंपनी एक नवीन वायरलेस पावर अडॅप्टर सुद्धा लाँच करणार आहे.
५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट
कंपनीच्या आगामी सीरिजमध्ये वनप्लस ९ आणि ९ प्रो चा समावेश असणार आहे. यासह वनप्लस ९ लाइटचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस ९ लाइट नुकताच लाँच करण्यात आलेल्या वनप्लस ८T शी मिळता जुळता असणार आहे. यामध्ये ९० Hz किंवा १२० Hz AMOLED (एमोलेड डिस्प्ले) आणि वनप्लस ८T सारखा क्वाड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. अँड्रॉईड सेंट्रलच्या अहवालानुसार यामध्ये सुपर फास्ट ६५ वॉट वॉर्प चार्ज सपोर्ट पण मिळणार आहे.