नवी दिल्ली - रिअलमीने डिझो हा सबब्रँड जगभरात लाँच केला आहे. हा ब्रँड स्मार्ट एन्टरमेंट, स्मार्ट होम, स्मार्ट केअर आणि अॅसेसरीजवर लक्ष केंद्रित करणार आहे.
डिझोला रिअलमीकडून डिझाईन, पुरवठा साखळी आणि एआयओटी अनुभवासाठी मदत करणार आहे. तसेच डिझो हे रिअलमीच्या सर्व अॅपला जोडता येणार आहेत. हा ब्रँड वापरकर्त्यांना जीवनाशी स्मार्ट, कार्यक्षमतेने जोडण्यास मदत करेल, असे रिअलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले. टेकलाईफ इकोसिस्टिममधील पहिला ब्रँड हा लाँच करताना अत्यंत आनंद होत आहे. यापूर्वीच कंपनीचे मोठी उत्पादने पाईपलाईनमध्ये आहेत.
हेही वाचा-पेट्रोल प्रति लिटर २३ पैसे, डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ
डिझोचे भारतातही घेण्यात येणार उत्पादन
डिझो हा ब्रँड लाईफस्टाईलसाठी एआयओटीमधून सोल्यूशन देणार आहे. या स्मार्टफोनचे उत्पादन लवकरच आशियामध्ये भारतासह इतर देशांत, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये घेण्यात येणार आहे. लाँच होण्यापूर्वीच डिझोचे देशातील ३१० हून अधिक शहरांमध्ये ३२० हून अधिक सर्व्हिस सेंटर आहेत.
हेही वाचा-केंद्राच्या निर्देशानंतर व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात केला 'हा' बदल
कंपनी १०० हून अधिक नवीन एआयओटी आणि लाईफस्टाईल उत्पादने चालू वर्षात लाँच करणार आहे. त्यामध्ये स्वस्तात परवडणारे स्मार्ट टिव्ही, स्मार्ट प्लग, ट्रिमर्स, स्मार्ट बल्ब आदींचा समावेश आहे.