टेक डेस्क - मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला लेटेस्ट स्मार्टफोन 'Moto G९ Power' लाँच केला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा मोबाईल यापूर्वीच लाँच करण्यात आला होता. गेल्या महिन्यात, यूरोपमध्ये EUR १९९ (जवळपास १७,७५० रुपये) या किमतीत हा मॉडेल कंपनीने लाँच केला होता.
भारतात हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. मागील १५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता या स्मार्टफोनचा पहिला सेल फ्लिपकार्टवर होता. 'मोटो जी९ पॅावर' मध्ये ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. हा फोन इलेक्ट्रिक व्हायलेट आणि मेटॅलिक सेज कलरमध्ये उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
'मोटो जी९' पॉवरची वैशिष्ट्ये
- ६.८ इंच HD+ डिस्प्ले (रिझोल्यूशन ७२०x१६४० पिक्सेल)
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर
- ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकणार.
- ६,००० mAh बॅटरी, २० W फास्ट चार्जिंग सपोर्ट
'मोटो जी९ पॉवर' कॅमेरा फिचर्स
- ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, प्रायमरी कॅमेरा ६४ मेगा पिक्सेल, अपर्चर - f/१.७९
- ट्रिपल कॅमेरामधील दूसरी लेंस २ मेगा पिक्सेल मॅक्रो तर तिसरी लेंस २ मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आहे.
- सेल्फी लव्हर्ससाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा.