नवी दिल्ली - आयटेल स्मार्टफोनचे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार आयटेल अॅमेझॉनवर एचडी प्लस डिस्प्ले व प्रिमियम लूक असलेला स्मार्टफोन १ फेब्रुवारीला लाँच करणार आहे.
आयटेल स्मार्टफोनमध्ये कव्हर्ड डिस्प्लेबरोबर ५.५ इंचची स्क्रीन असणार आहे. फोनमध्ये ड्युल सिक्युरिटीबरोबर २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजची सुविधा असणार आहे. ग्राहकांना अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी जास्तीत सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन ६ हजार रुपये किमतीच्या श्रेणीमध्ये लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने नुकतेच आयटेल व्हिजन १ प्रो लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर देण्यात आले होते.
हेही वाचा-आर्थिक सर्वेक्षणात केवळ सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक - पी. चिदंबरम
ग्रामीण भागांतील ग्राहकांवर कंपनीचे लक्ष्य
आयटेलकडून नेहमीच कमी किमतीमध्ये चांगले तंत्रज्ञान असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येतात. यामध्ये डिजीटल आणि मनोरंजनाच्या गरजा पूर्ण व्हाव्या, यावर विशेष भर देण्यात येतो. आयटेलने फ्लॅगशिप व्हिजन श्रेणीत व्हिजन १ स्मार्टफोन हा टायर-३, टायर-४ , शहर आणि ग्रामीण भागांना समोर ठेवून लाँच केला होता. काउंटरपाँईट रिसर्चच्या आकडेवारीनुसार आयटेलचा भारतीय बाजारपेठेत २०२० मध्ये हिस्सा ६ टक्क्यांवरून वाढून ९ टक्के झाला आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून वित्तीय तुटीत १४५.८ टक्क्यांची वाढ