नवी दिल्ली - इंटेलने डेस्कटॉपसाठी वापरण्यात येणारे प्रोससर जवळपास पाच वर्षानंतर लाँच केले आहे. हे अकराव्या पिढीतील जेन कोअर एस-सिरीज प्रोससर कोडनेम रॉकेट लेक-एस नावाचे आहे. गेमर्स आणि पीसीबाबत उत्सुक असणाऱ्यांसाठी हे प्रोससर अधिक कार्यक्षमतेने काम करू शकते.
कोअर आय ९-११९०० के हे आठ कोअर्स आणि १६ थ्रेडसह आहे. याचा वेग ५.३ गीगहार्टझ आहे. डीडीआर४ चा ३,२०० मेगाहार्टझपर्यंत सपोर्ट आहे. लाँच झालेले हे प्रोसेसर फास्ट मेमरी असलेले आहे. त्यामधून निवांतपणे गेमिंगचा अनुभव घेता येणे शक्य आहे. तसेच कधी नव्हे असे मल्टीटास्किंग कामे करणे शक्य असल्याचे इंटेलने म्हटले आहे. ११ व्या जेन इंटेल कोअर एस-श्रेणीमधील डेस्कटॉप प्रोसेसरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे चांगल्या गेमिंगसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गेमर्सला कुठेही गेमिंगचा चांगला अनुभव मिळविणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढून ६७ टक्के-स्टेट बँकेचे चेअरमन
या प्रोससरमध्ये नवीन १९ टक्क्यापर्यंत चीप वाढविण्यात आल्या आहेत. तर ग्राफिक्स आणि इंटेल युएचडी ग्राफिक्स फीचरिंग इंटेल एक्सई ग्राफिक्स आर्किटेक्टरमध्ये ५० टक्के सुधारणा करण्यात आली आहे. २०० हून अधिक आघाडीच्या गेम डेव्हलपरबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे इंटेलने गेम, इंजिन, मीडलवेअर आणि रेडंरिक ऑप्टिमायझेशन हे अधिक चांगल्या पद्धतीने प्रोसेसरमध्ये दिले आहे.
हेही वाचा-डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढून ६७ टक्के-स्टेट बँकेचे चेअरमन