सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवे फिचर आणत असते. यावेळी व्हॉट्सअॅपने फिंगरप्रिंट लॉक'चे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅपचे संदेश (चॅट) आता आणखी सुरक्षित राहणार आहेत.
फिंगरप्रिंट लॉक हे फिचर सुरू केल्याशिवाय व्हॉट्सअॅप सुरू करता येणार नाही. असे असले तरी वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपचे कॉल स्वीकारता येणार आहेत.
असे सुरू करा फिंगरप्रिंट लॉक फिचर-
- व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जा.
- त्यानंतर गो अकाउंटवरचा पर्याय उघडा.
- प्रायव्हसीचा पर्याय दिसताच तिथे फिंगरप्रिंट लॉक निवडा.
जुन्या व्हॉट्सअॅपवरही हे फिचर भविष्यात मिळू शकते. मात्र हे फिचर सध्या अपडेटेड व्हर्जनवर उपलब्ध आहे. त्यासाठी २.१९.२२१ हे व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे.