नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात ट्विटरवरून अनेकांना ऑक्सिजन अथवा औषधांची मदत मागणे उपयुक्त ठरत आहे. अशा स्थितीत ट्विटरने कोरोनाशी संबंधित पेजेस राज्यनिहाय लाँच केले आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात ट्विट हे वापरकर्त्याला सोप्या पद्धतीने व सुरुवातीला दिसू शकणार आहेत.
ट्विटरने सात राज्यांचे पेजेस लाँच केले आहेत. वापरकर्त्यांना इंग्रजी आणि स्थानिक भाषेत ट्विट उपलब्ध होऊ शकेल, असे ट्विटर कंपनीने म्हटले आहे. कोव्हिड १९ संदर्भात टाईमलाईनवर सर्वात ताजी आणि विश्वसनीय बातम्या वापरकर्त्यांपर्यत पोहोचण्यासाठी ट्विटरचा प्रयत्न आहे. त्यासाठी कंपनीने माध्यम आणि देशातील पत्रकारांबरोबर करार केले आहेत. ट्विटर एपीआयचा वापर करून भारतामधील डेव्हलपर हे क्रियटिव्ह टूल्स आणि अॅप बनवित आहेत. त्यामुळे लोकांना वैद्यकीय मदत, ऑक्सिजन, अन्न आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची माहिती मिळणे सुकर होत आहे.
हेही वाचा-नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
डेव्हलपरबरोबर काम सुरू
डेव्हलपरच्या सेवेचा जास्तीत जास्त परिणाम व्हावा, यासाठी त्यांच्याबरोबर जवळून काम करण्यात येत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटर एपीआयचा वापर करून तयार केलेल्या टूल्समध्ये रिअल टाईममधील ट्विट्स शोधणे सोपे जाते. तसेच स्थानिक भागाप्रमाणे ट्विट्स शोधता येत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
हेही वाचा-युट्यूबमधील 'शॉर्ट्स' व्हिडिओकरता 'या' कंपनीचे मिळणार मोफत संगीत