सॅनफ्रान्सिस्को- फेसबुकने १७० हून अधिक देशांमध्ये इन्स्टाग्रामचे नवीन लाईट अॅप लाँच केले आहे. त्यामुळे ग्रामीणसह दुर्गम भागातील समुदायांमध्ये उच्च दर्जाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करता येणे शक्य आहेत. त्यासाठी कमीत कमी डाटा लागणार आहे.
इन्स्टाग्राम लाईट अॅप हे निवडक अँड्राईडच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तर आयओएस व्हर्जनमध्ये लाईट अॅप मिळू शकणार नाही.
हेही वाचा-देशातील पहिले साखर संग्रहालय पुण्यात होणार सुरू
- आजपासून १७० हून अधिक देशांमध्ये इन्स्टाग्राम लाईट अपॅ डाऊनलोड करता येणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यासाठी कोणतेही डिव्हाईस आणि नेटवर्क असले तरी दर्जेदार व्हिडिओ आणि फोटोमध्ये फरक पडणार नाही.
- लाईट व्हर्जनमध्ये केवळ २ एमबीची जागा लागणार आहे. इन्स्टाच्या मूळ व्हर्जनमध्ये ३० एमबीची जागा लागते.
- लाईट अॅपमध्ये रिल्सचे शॉर्ट व्हिडिओ फीचरदेखील आहे.
- लाईट अॅपमध्ये जीआयएफ आणि स्टिकरचाही पर्याय देण्यात आला आहे.
- यापूर्वी २०१८ मध्ये इन्स्टाचे लाईट अॅप लाँच करण्यात आले होते.
- लाईट अॅपची भारतात डिसेंबर २०२० मध्ये चाचणी घेण्यात आली होती.
हेही वाचा -बँक कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा: चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता