नवी दिल्ली - अॅमेझॉनने मिनी टिव्ही ही मोफत व्हिडीओ स्ट्रिमिंगची सेवा भारतामध्ये सर्वात प्रथम लाँच केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना मोफत वेबसिरीज, टेक न्यूज आदी व्हिडिओ मोफत पाहता येणार आहेत.
अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रिमिंगची सेवा अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर दिसणार आहे. त्यामध्ये जाहिरातीमध्ये दिसणार आहेत. मिनी टिव्हीवरील वेब सिरीज, कॉमेडी शो, टेक न्यूज हे व्यावसायिक पद्धतीने दाखविण्यात येणार आहेत. शॉपिंग अॅपमध्ये लाखो उत्पादनांसह मोफत मनोरंजन व्हिडिओ पाहता येणार आहेत.
हेही वाचा-सिम्पल एनर्जी ऑगस्टमध्ये करणार ई-स्कूटर लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये
अँड्राईडवरील अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर उपलब्ध
सध्या मिनी टिव्ही हे अँड्राईडवरील अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर उपलब्ध आहे. लवकरच आयओएस आणि मोबाईल वेबवर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी कंपनीने प्राईम व्हिडिओमधूनही मनोरंजनाची सेवा दिलेली आहे.
हेही वाचा-१.१ अब्ज डॉलर वसुलीकरता एअर इंडियाविरोधात केअर्नची अमेरिकेच्या न्यायालयात धाव
- मिनी टिव्ही हे मोफत आहे. त्यासाठी स्वतंत्र अॅप नाही. तर प्राईम व्हिडिओला वार्षिक नोंदणी करावी लागते.
- प्राईम व्हिडिओमध्ये चित्रपट आणि टिव्ही शो हे इंग्रजीसह ९ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
- मिनी टिव्हीमध्ये विनोदी कलाकार आशिष चंचलानी, अमित भदाना, श्रुती अर्जुन आनंद यांचे कार्यक्रमही दिसणार आहेत.