कॅलिफोर्निया - २०२० या वर्षात कोरोनामुळे अनेकांनी घरातून काम केले आहे. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन काम करणे शिकले आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाईन झाली आहे. गुगल क्लाउड सेवेच्या नव्या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांनी त्यांचे उद्दिष्टे पूर्ण करणे शक्य झाले आहे.
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण आयुष्य पूर्णपणे डिजीटल झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी ऑनलाईनवर वेळ घालविण्यास सुरुवात केली. गुगल मीटमुळे वापरकर्त्यांना काम करणे सुकर झाले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग-
- गुगल मीट हे अॅडव्हान्स्ड जी सूट आणि जी सूट शिक्षणासाठी मोफत झाले आहे.
- गुगल मीटमध्ये २५० लोकांना एकाचवेळी ऑनलाईन भेटता येते. तर एकाच डोमेनवरून १ लाख लोकांना लाईव्ह स्ट्रीम पाहता येते. हे मीटिंगचे रेकॉर्डिंग करणे आणि ड्राईव्हला जतन करणे शक्य आहे.
- एकाचवेळी ४९ व्यक्तींना सहभागी होता येतो.
- अकाउंट हॅक टाळण्यासाठी सुरक्षा दिलेली आहे.
- गुगल क्लाउडसाठी मल्टी स्टेप अकाउंट व्हेरिफेकेशन आणि अतिरिक्त संरक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
हेही वाचा-जावडेकर म्हणाले 'हे' मी सिद्ध करेन, राहुल गांधींनी खुल्या चर्चेला यावे
गुगलमुळे काम करणे आणि शिकण्याच्या नवीन पद्धतींची सुरुवात
- ऑक्टोबरमध्ये गुगल वर्कस्पेस लाँच केले आहे. त्यामधून जीमेल, कॅलेंडर, शीट्स, मीट, ड्रायव्ह हे अॅप वापरता येते.
- गुगल वर्कस्पेसमध्ये व्हिडिओ, चॅट, ईमेल, फाईल्स आणि टास्क जोडता येतात.
- जीमेल इनबॉक्समध्ये नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये मीटिंगमध्ये सहभागी होणे, सहकाऱ्यांच्या कागदपत्रांचे संपादन करणे, रिअल टाईममध्ये सहकाऱ्यांशी संवाद करणे आदींचा समावेश आहे.
हेही वाचा-केरळमधील २१ वर्षांची आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर