ETV Bharat / jagte-raho

घरफोडी अन् दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त - solapur crime news

चोरीचे दागिने विकण्यासाठी चोरीच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांना गुन्हे प्रकरटीकरण पथकाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

MIDC police
MIDC police
author img

By

Published : Aug 15, 2020, 6:03 PM IST

सोलापूर - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या व दुचाकी चोऱ्या वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत दोघा चोरट्यास चोरीचे सोने विक्री करताना रंगेहात पकडले. त्याकडून 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. बसन्ना सतू शिंदे (रा. गोंधळे वस्ती, न्यू शिवाजी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) व अजय शिवाजी माने (रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. यांना अटक करून न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने दोघा संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर यांना 14 ऑगस्टला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, बसन्ना शिंदे व अजय माने हे दोघे अक्कलकोट रोडवरून चोरलेल्या एका दुचाकीवरून सोने विक्रीसाठी सराफा बाजारात जाणार आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी 256 गाळा या ठिकाणी सापळा लावला होता. दोघे त्या ठिकाणी आले असता पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी इशारा केला. पण, दोघे पळून जात होते. परंतु पोलिसांनी दोघा चोरट्यांना जागेवरच पकडले.

बसन्ना शिंदे व अजय माने या संशयित चोरट्यांना पकडून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेल्या चोरींची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून 28 ग्राम सोने (अंदाजे किंमत 72 हजार रुपये) व विविध कंपन्यांचे चार मोटारसायकली (अंदाजे किंमत 1 लाख 25 हजार), असा एकूण 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार, चौगुले, पोलीस नाईक गुरव, फुटाणे, शिंदे, कांबळे आदींनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.