ETV Bharat / jagte-raho

सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या - अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या

माढा तालुक्यातील अंजनगाव येथे प्रेम प्रकरणातून दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या
author img

By

Published : Oct 3, 2019, 10:20 AM IST

सोलापूर - माढा तालुक्यातील अंजनगाव येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीने केलेली आत्महत्या ही गावातील एका मुलाच्या त्रासाला कंटाळून केली असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे.

सोलापूरमध्ये माढा तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलीची आत्महत्या

माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) गावातील एका वस्तीवर राहणाऱ्या दहावीतील मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. या मुलीने केलेली आत्महत्या ही गावातील एका मुलाच्या त्रासाला कंटाळून केली असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे. यामुळे मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा... रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या

2 ऑक्टोबर रोजी रात्री सायंकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. घरात कोणालाही न सांगता ही मुलगी बेपत्ता झाली होती. आई-वडिलांनी व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यामुळे घरच्यांनी या प्रकरणाची खबर माढा पोलिसांना दिली. यानंतर तिचा शोध घेतला असता, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळला.

हेही वाचा... पनवेलमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशामक अधिकाऱ्याची आत्महत्या​​​​​​​

आरोप करण्यात आलेला मुलगा आणि मुलीमध्ये चिठ्ठी व फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे यांनी तातडीने घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच मुलीच्या वडिलांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी अंजनगावमधील दोन अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Intro:mh_sol_01_madha_suside_7201168

प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या,
माढा तालुक्यातील अंजनगाव येथील घटना,

सोलापूर-

इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या जीवनाचा शेवट विहीरीत आत्महत्या करुन केला आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव(खेलोबा)गावातील एका वस्तीवर राहणाऱ्या दहावीतील मुलींन आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलले आहे. Body:मुलींने आत्महत्या ही गावातील एका मुलाच्या त्रासाला कंटाळून केली असल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ही घटना दि 2 ऑक्टोबर रोजी रात्री सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुलीचा मृतदेह माढा पोलिसांनी व ग्रामस्थांनी विहीरीतुन बाहेर काढला.

दोघा मध्ये चिठ्ठीतुन व फोन वरुन संभाषण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मयत मुलगी ही गावातील श्री खेलोबा विद्यालयात दहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. दरम्यान मंगळवारी शाळेतून आल्यावर ती घरातून निघून गेली होती.
कोणालाही घरी काही न सांगता बेपत्ता झाली होती. आई वडिलांनी व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला.मात्र ती काही सापडली नाही.याची माढा पोलिसांना खबर दिली गेली.बुधवारी सायंकाळी पाच च्या सुमारास तिचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहीरीत आढळला.
पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे यानी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने तिचा मृतदेह सहा वाजताच्या सुमारास विहीरीतुन बाहेर काढला. वडिलांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अंजनगाव मधील दोघा अल्पवयिन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.