ETV Bharat / jagte-raho

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत केला खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या करून स्वतः विषारीद्रव प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी पतीवर अंबाजागाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी
author img

By

Published : Nov 18, 2020, 6:35 PM IST

बीड - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका व्यक्तीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः विषारीद्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी परळी तालुक्यातील बोधेगाव येथे दुपारी चारच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर (वय २७ वर्षे, रा. होळ, ता. केज), असे त्या मृत पत्नीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज ऊर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी (वय ५ वर्षे) आणि एक मुलगा (वय ३ वर्षे) आहे. काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यांपूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला. त्यानंतर ती राहण्यासाठी माहेरी बोधेगावला तळावर नामक शेतातील घरी आली होती. सोमवारी दुपारी धनराज बोधेगावला आला.

सासुरवाडीत ज्ञानेश्वरीचा भाऊ वैजनाथने धनराजसोबत जेवण केले आणि शेळ्या चारण्यासाठी निघून गेला. दुपारी ४ वाजता धनराज पुन्हा सासुरवाडीच्या घरी आला. सासरी नांदण्यास का येत नाहीस, असे म्हणत त्याने चारित्र्यावर संशय घेत ज्ञानेश्वरीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागाने बेभान झालेल्या धनराजने धारदार कत्तीने ज्ञानेश्वरीच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

ज्ञानेश्वरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून तिची बहिण कल्पनाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नातेवाईक धावत आले. यावेळी धनराजने सोबत आणलेल्या बाटलीतील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी अत्यवस्थ झालेल्या धनराजला अंबाजोगाईच्या एका रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वरीची बहीण कल्पना शामराव सोडगीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनराज सोनवर याच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.