ETV Bharat / jagte-raho

कोरोना आरोपींच्या पथ्थ्यावर, 23 जणांना मिळाला अंतरिम जामीन

author img

By

Published : Jun 24, 2020, 12:07 PM IST

Updated : Jun 24, 2020, 3:26 PM IST

जालना जिल्हा कारागृहामध्ये 143 आरोपींनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 23 जणांना याचा फायदा मिळाला आहे. उर्वरीत आरोपींना शिक्षा जरी झाली नसली, तरी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

jalna district court
जालना जिल्हा सत्र न्यायालय

जालना - जग कोरोनासारख्या महामारीने त्रस्त असताना कारागृहामध्ये सध्या दाबून ठेवलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यामुळे या आरोपींना कोरोनाचा फायदा झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या 23 आरोपींना पंचेचाळीस दिवसांसाठी हा अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र, त्यानंतरही ते न्यायालयाला विनंती करून हा जामीन वाढवून घेऊ शकतात.

कोरोनाचा असाही फायदा; 23 आरोपींना मिळाला अंतरिम जामीन

राज्यामध्ये कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी उच्चाधिकार समिती मुंबई आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या जनहित याचिकेमधील निर्देशाप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालय आणि विधी सेवा प्राधिकरण जालना यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण 23 आरोपींना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जमीन मिळाल्यामुळे या आरोपींची कारागृहातून मुक्तता झाली असून, त्यांना त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोलीस प्रशासनाने नेऊन सोडले आहे.

जालना जिल्हा कारागृहामध्ये 143 आरोपींनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी फक्त 23 जणांना याचा फायदा मिळाला आहे. उर्वरीत आरोपींना शिक्षा झाली नसली तरी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर खटला सुरू आहे. त्याचसोबत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांना जामीन नाकारला आहे. त्यामुळे या उर्वरीत आरोपींना जामीन मिळाला नाही. मात्र, या 23 आरोपींना जामीन मिळाल्यामुळे कोरोनासारख्या महामारीतही त्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना आरोपींच्या पथ्थ्यावर -

जालना मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या 23 आरोपींना आतापर्यंत जामीन मिळाला नव्हता. कोरोना काळात आरोपींना कारागृहात संसर्ग होऊ नये म्हणून, न्यायालयाने अशा आरोपींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी अर्ज मागविले होते. या अर्जावर विचार करून न्यायालयाने 23 जणांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे हे आरोपी 45 दिवसांची जामीनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाकडे पुन्हा अर्ज करून जामीन वाढवून घेऊ शकतात. हा प्रकार संबंधित गुन्ह्याचा खटला निकाली लागेपर्यंत सुरू राहू शकतो. मात्र, त्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाला या आरोपींना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, तूर्तास तरी हे आरोपी कारागृहातून मुक्त झाले आहेत.

Last Updated : Jun 24, 2020, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.