ETV Bharat / jagte-raho

जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर बोईसर पोलिसांची कारवाई, ५२ हजार रुपये जप्त

बोईसर पोलिसांनी छापा टाकत 6 जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 52 हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

बोईसर पोलीस ठाणे
बोईसर पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 17, 2020, 4:06 PM IST

पालघर - बोईसर पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 6 आरोपींवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 52 हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील भैया पाडा येथील एका चाळीच्या मागील मोकळ्या जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता फारुख लतिफ खान (वय 36 वर्षे), हारून सुलेमान खान (वय 50 वर्षे), अमीरअली कासमअली बुधवानी (वय 54 वर्षे), नफीस वकार अली (वय 32 वर्षे), कल्लू नसीर खान (वय 35 वर्षे), मोहम्मद जलील दफेदार (वय 54 वर्षे) हे सहा आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत 52 हजार 300 रुपये रोख रक्कम जप्त केली असून आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 188 सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.