मुंबई - काल (शनिवारी) शाहीनबाग येथे एकाने गोळीबार केला होता. या विरोधात शनिवारी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि एलजीबीटी संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात 'शरजील तेरे सपनों को हम मंजिल तक पोहचाऐंगे' अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ पोलिसांना देत भाजपने कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा - देविंदर सिंग अटकेप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआएयचे छापे
गेल्या जानेवारी महिन्यापासून सीएए आणि एनआरसी विरोधात मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. यामध्येच आजाद मैदान येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. आंदोलनात विद्यार्थ्यांनी 'शरजील तेरे सपनों को हम मंजिल तक पोहचाऐंगे' अशा घोषणा दिल्या. याचा व्हिडिओ भाजपच्या हाती येताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर आक्षेप घेत आंदोलकांनी राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली आहे व त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.