ETV Bharat / jagte-raho

पोर्नोग्राफिक वेबसाईट बघताय तर व्हा सावध ..मागितली जातेय डिजिटल खंडणी

एखाद्या वेळेस पोर्नोग्राफिक वेबसाईट क्लिक केल्यास त्याचे मालवेअर (malware) तुमच्या नकळत तुमच्या कॉम्प्युटरमधील सर्व फाईल्स झिप करून त्याला एक पासवर्ड देऊन टाकते व त्याची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे ऑनलाईन पाठविते. त्याद्वारे वापरकर्त्याला डाटा व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते.

Extortion through pornography
डिजिटल खंडणी
author img

By

Published : Jun 11, 2020, 7:19 PM IST

Updated : Jun 11, 2020, 8:38 PM IST

मुंबई - सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्यात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे , मात्र सतत इंटरनेट वर कुठल्याही अनोळखी साईटवर क्लिक करण्या आगोदर तुम्ही सावध असणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे अनोळखी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर जाणाऱ्या व्यक्तींना गेल्या काही दिवसात बिटकॉईनच्या माध्यमातून डिजिटल खंडणी मागितली जात आहे.

रितेश भाटिया, सायबर एक्सपर्ट

इंटरनेट वर एखादी व्यक्ती चुकून किंवा कुतूहलापोटी इंटरनेट सर्फ करताना विविध वेबसाईटसवर क्लिक करते ,आणि त्यांच्या नकळत एखादे मालवेअर ( malware) डाउनलोड होते. यात एखाद्या वेळेस पोर्नोग्राफिक वेबसाईट क्लिक केल्यास त्याचे मालवेअर (malware) तुमच्या नकळत तुमच्या कॉम्प्युटरमधील सर्व फाईल्स झिप करून त्याला एक पासवर्ड देऊन टाकते व त्याची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे ऑनलाईन पाठविते.
या बद्दल कुठलीही जाणीव नसणाऱ्या पीडित व्यक्तीला कालांतराने सायबर गुन्हगारांकडून एक मेसेज वा ई-मेल येतो. ज्यात लिहले असते कि , 'आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या पोर्नोग्राफिक वेबसाईट बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो, तसेच तुमच्या कॉम्प्युटरमधील सर्व फाईल्स आम्ही पासवर्डद्वारे लॉक केल्या आहेत . त्यामुळे तुम्हाला जर तुमची वेबसाईट सर्फिंग (surfing) ची माहिती प्रसिद्ध होऊ द्यायची नसेल व तुमच्या सर्व फाईल्स अनलॉक करून हव्या असतील तर तुम्ही मेसेज मध्ये दिलेल्या खात्यामध्ये बिटकॉइन (bitcoins) च्या माध्यमातून ठराविक रक्कम जमा करा अशी धमकी दिली जात आहे.

काय करायला हवे..

दीर्घकाळ इंटरनेटवर असणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो इंटरनेट सर्फ करताना कोणत्याही अनोळखी किंवा पोर्नोग्राफिक वेबसाईटवर जाणे टाळावे. आपल्या ऑफिसचा कॉम्प्युटर किंवा आपल्या व्यावसायिक माहिती असणाऱ्या कॉम्प्युटरचा किंवा आपल्या मोबाईलचा उपयोग अशा कामासाठी बिलकुल करू नये. तसेच तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरावे . आपल्या ऑफिसच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी निगडित महत्वपूर्ण काही फाइल्स असतील तर त्यांचा बॅकआप ( backup) एका वेगळ्या पोर्टेबल ड्राईव्ह (portable drive) वर घेऊन ठेवावे. मात्र, हे करताना तुम्ही वापरात असलेला पोर्टेबल ड्राईव्ह हा शक्यतो इंटरनेटशी कनेक्ट होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा प्रकारे कोणी खंडणी मागितल्यास ती बिलकुल देऊ नये व सायब्र पोलिसांकडे त्याबाबत तक्रार करावी.

Last Updated : Jun 11, 2020, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.