मुंबई - अभिनेत्री मनीषा कोईरालाचे वडील प्रकाश कोईराला हे माजी कॅबिनेट मंत्री आहेत आणि तिचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला नेपाळचे पंतप्रधान होते. प्रतिष्ठित राजकीय घराण्याशी संबंधित असूनही मनीषा राजकारणापासून लांब आहे. या क्षेत्रात ती काय पुढं आली नाही याचा खुलासा तिनं एएनआयशी झालेल्या संभाषणात मनीषानं केला आहे.
"एका कलाकाराला राजकारणी व्हायचं असेल तर त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कारण कलाकार म्हणून आमच्याकडे विशेष लक्ष वेधलं जातं. आम्ही एखाद्या बॉस सारखे असतो. राजकारणी हा मूळात नेता असतो आणि लोकांना चालवत असतो पण त्याचवेळी तो लोकसेवकही असतो.", असं मनीषा म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, "तुम्ही लोकांच्या मदतीसाठी आहात त्यामुळे तुम्हाला हे समजले असेल, तुम्ही मुळात लोकांचे सेवक आहात हे तुम्ही हे मान्य केले असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. पण बऱ्याच कलाकारांचं तसं झालं नाही."
मनीषा कोइरालाचा जन्म राजकीय दृष्ट्या यश मिळालेल्या कुटुंबात झाला आहे. त्यामुळेच तिला राजकारण चांगलं समजतं. राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नाही, असंही तिला वाटतं.मनिषा कोइराला ही नेपाळमधील अतिशय प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात वाढलेली असली तरी तिनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःला झोकून दिलं. अभिनय हेच तिनं करियर म्हणून निवडलं. हे क्षेत्र तिच्या कुटुंबासाठी पूर्णपणे नवीन होतं.
मनीषा म्हणाली, "मी कुटुंबातील इतर सदस्यांहून पूर्णपणे वेगळी होते. मी बनारसमध्ये वाढले आणि माझे शालेय शिक्षण वसंत कन्या महा विद्यालयात झालं. तिथून अर्थातच दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये मी दोन वर्षे अभ्यास केला, त्यानंतर मी चित्रपटात आले."
मनिषा कोइरालाची अभिनय क्षेत्रातीव प्रवेश खूप रंजक आहे. तिनं नेपाळी जाहिरात पहिल्यांदा केली होती. ही संधी तिला आईच्या चुलत भावामुळे मिळाली होती. तो नेपाळमध्ये जाहिरात फिल्म निर्माता होता. त्यानं मनिषाला बोलावलं आणि मेकअपसह फोटो घेतला. ती फोटोजनिक असल्याचं तो म्हणाला. त्यानंतर त्यानं अॅड फिल्मसाठी विचारलं असता तिनं होकार दिला. यातूनच तिला अभिनयाची आवड लागली. पुढं तिला यासाठी मुंबईला जावं लागणार होतं. तिनं घरी तशी परवानगी मागितली. सिनेक्षेत्राविषयी त्यांना माहिती नसल्यामुळे मनिषाच्या कुंटुंबीयांनी तिला सुरुवातीला विरोधच केला होता, असंही तिनं चर्चे दरम्यान सांगितलं.
नेपाळमधील राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना मनिष म्हणाली, "मी एका राजकीय कुटुंबात वाढले आणि मला राजकारण समजतं. माझ्या आजी म्हणायची की, ही सेवा आहे आणि ती लोकांसाठी आहे. मी माझ्या वडिलांना विचारले, तुम्ही कसे आहात? आणि ते म्हणाले की हे सर्वकाही लोकांसाठी करत आहे आणि जेव्हा ते वास्तविकतेपासून वेगळे होते तेव्हा मला याचा त्रास व्हायचा. नेपाळमध्ये सामील असलेल्या राजकीय लोकांना मी समजू शकते."
कामाच्या आघाडीवर मनिषा कोइराला तिच्या '1942: अ लव्ह स्टोरी', 'बॉम्बे', 'खामोशी: द म्युझिकल', 'गुप्त', 'दिल से' आणि इतर अनेक चित्रपटांसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिनं संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. या मालिकेत मनीषाने सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि आदिती राव हैदरी यांच्यासह इतरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली होती. यातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.