लंडन/हैदराबाद : लंडनमधील वेम्बले येथील नील क्रिसेंट परिसरात हैदराबादमधील एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यावेळी मुलीच्या मदतीसाठी गेलेली तिची मैत्रीणही गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव तेजस्विनी रेड्डी असे आहे. ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. या प्रकरणी हत्या करणाऱ्या ब्राझिलियन तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
एका ब्राझिलियन व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर लंडन पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 13 जून रोजी सकाळी 9:59 वाजता लंडनमधील वेम्बले परिसरात घडली. - लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस
उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती : माहितीनुसार, आरोपी ब्राझिलियन तरुण एक आठवड्यापूर्वी तेजस्विनी व तिच्या मैत्रिणी जेथे राहत होत्या तिथे राहायला आला होता. 27 वर्षीय तेजस्विनी तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगरच्या ब्राह्मणपल्ली येथील रहिवासी होती. ती मार्च 2022 मध्ये लंडनला एमएस करण्यासाठी गेली होती. बुधवारी तेजस्विनीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. चाकू मारल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कुटुंबियांची मृतदेह लवकर भारतात आणण्याची विनंती : यावेळी तेजस्विनीशिवाय तिच्या मैत्रिणीवरही हल्ला करण्यात आला. मात्र तिची मैत्रीण या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तेजस्विनीच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या आई-वडिलांचा आक्रोश सुरू केला. आपल्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणावा, अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे. तेजस्विनीचे पार्थिव लवकरच हैदराबादला आणले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा :