ETV Bharat / international

Narendra Modi Yoga : नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात केला योग, वॉशिंग्टन डीसीला रवाना - योग दिवस 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या कार्यक्रमात 180 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित लोकांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी येथून वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले.

Narendra Modi
नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jun 21, 2023, 6:30 PM IST

Updated : Jun 21, 2023, 10:58 PM IST

पहा व्हिडिओ

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या लॉनवर विशेष योग सत्रानंतर बुधवारी वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले. 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने सर्वाधिक राष्ट्रांच्या लोकांनी योगासने केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांसोबत डिनरचे आयोजन : 22 जून रोजी वॉशिंग्टन डीसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले जाईल. संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन करतील. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. 23 जून रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहभोजनाचे आयोजन केले जाईल.

  • #WATCH | At the Yoga Day event at the UN HQ in New York, PM Narendra Modi says, "Last year the entire world came together to support India's proposal to celebrate 2023 as the International Year of Millets...It is wonderful to see the entire world come together again for Yoga." pic.twitter.com/h461S45hdV

    — ANI (@ANI) June 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नरेंद्र मोदींचे संबोधन : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी, 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा योग सुमारे 20 मिनिटे चालला. योग कार्यक्रमाचे नेतृत्व सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी येथे उपस्थित लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्यापैकी बरेच जण दूरच्या ठिकाणाहून आले आहेत, ज्याचे मला कौतुक वाटते. ते म्हणाले की, आपली हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतातून योग आला आहे.

  • #WATCH | At the Yoga Day event at the UN HQ in New York, PM Narendra Modi says, "...Let us use the power of Yoga not only to be healthy, happy but also to be kind to ourselves and to each other. Let us use the power of Yoga to build bridges of friendship, a peaceful world and a… pic.twitter.com/QwAEEBo9r8

'योग सर्वांसाठी आहे' : यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, योग कॉपीराइटपासून, पेटंटपासून आणि रॉयल्टी पेमेंटपासून मुक्त आहे. योग पोर्टेबल आहे. आपण तो घरी, कामावर किंवा प्रवासातही करू शकतो. योग लवचिक आहे. तुम्ही एकट्याने किंवा गटात त्याचा सराव करू शकता. तसेच योग एकरूप आहे. तो सर्वांसाठी, सर्व जातींसाठी, सर्व धर्मांसाठी आणि सर्व संस्कृतींसाठी आहे.

अनेक मान्यवरांची उपस्थिती : न्यूयॉर्कमधल्या UN मुख्यालयातील योग दिनाच्या कार्यक्रमात 77 व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी, अभिनेता रिचर्ड गेरे आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी सहभाग नोंदवला. तसेच या कार्यक्रमात डिजिटल प्रचारक वाला अफशर, लेखक जय शेट्टी, भारतीय शेफ विकास खन्ना आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज हे देखील सहभागी झाले.

हेही वाचा :

  1. PM Modi US Visit : भारत-अमेरिकेतील 'हे' पाच मोठे संरक्षण करार चीन, पाकिस्तानची झोप उडवतील! जाणून घ्या

Last Updated : Jun 21, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.