जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनने रुग्णांच्या संख्येत रविवारी सर्वात मोठी एक दिवसीय वाढ नोंदविली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जगभरात तब्बल 1 लाख 83 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीने सांगितले की, ब्राझीलमध्ये 54 हजार 771 रुग्णांची नोंद झाली आहे. तर अमेरिकेत 36 हजार 617 रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठा भारतात 15 हजार 400 पेक्षा जास्त रुग्ण 24 तासांमध्ये आढळले आहेत.
जगभरामध्ये 87 लाख 8 हजार 8 रुग्ण आढळले आहेत. तर 4 लाख 61 हजार 715 नागिरकांचा मृत्यू झाला आहे. तरे गेल्या 24 तासांमध्ये जगभरात 4 हजार 743 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या नवीन मृत्यूंपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान स्पेनमध्ये, तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर अधिकाऱयांनी लॉकडाऊन संपवले. 14 मार्चनंतर प्रथमच 14 दशक्षल रहिवासी प्रथमच मुक्तपणे देशभर प्रवास करु शकतील. तसेच 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधीही रद्द केला आहे. स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी नागिराकांना जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
अमेरिकेने 25 दशलक्ष लोकांची चाचणी केल्याचे टुल्सा, ओक्खलामा येथील प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. जितक्या जास्त चाचण्या होतील. तितके जास्त कोरोनाबाधित आढळतील, असेही ते म्हणाले.