ETV Bharat / international

अमेरिकेतील विद्यापीठात घुसलेल्या माथेफिरूकडून अंदाधुंद गोळीबार, तीन जण ठार - अमेरिका गोळीबार न्यूज

US Firing महासत्ता असलेली अमेरिका पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. लास वेगासमधील गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. तर यात संशयित हल्लेखोराचादेखील मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

US Firing
US Firing
author img

By PTI

Published : Dec 7, 2023, 7:54 AM IST

Updated : Dec 7, 2023, 8:32 AM IST

लास वेगास US Firing - नेवाडा विद्यापीठात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. चौथा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर हल्लेखोराचादेखील मृत्यू झाला. यापूर्वी 2017 मध्ये लास वेगासमध्ये झालेल्या गोळीबारात 60 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेन वेळेनुसार सकाळी पावणेबारा वाजता विद्यापीठात हल्लेखोरानं हल्ला केला. विद्यापीठानं पोलिसांना कळविताच पोलीस विद्यापीठात पोहोचले. हल्लेखोराला घाबरून विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गखोल्या आणि वसतिगृहात लपून बसले होते. हल्लेखोराला पोलिसांनी गुंतवून ठेवले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला. विद्यापीठातील हल्ल्यानं अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

  • घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा मतीन म्हणाले, ही घटना खूप भयंकर होती. मी स्वत:ची समजूतदेखील काढू शकत नाही. हल्ल्यावेळी विद्यार्थ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मला अशा भावना पुन्हा कधीही अनुभवयाच्या नाहीत. हल्लेखोरानं गोळीबार करत वर्गखोलीत येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 12 विद्यार्थ्यांनी दार अडविल्याची माहिती विद्यार्थी मॅथ्यू फेलसेनफेल्डनं दिली.
  • 1 ऑक्टोबर 2017 रोजी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण सामूहिक हत्याकांड लास वेगासमध्ये झाले होते. त्यावेळी संगीत कार्यक्रमात जमलेल्या लोकांवर माथेफिरूनं गोळीबार करत 60 लोकांना ठार मारले होते. या हल्ल्यात शेकडो नागरिक जखमी झाले होते. अमेरिकन नागरिकांच्या या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
  • नेवाडा विद्यापीठातील गोळीबारत जखमी झालेल्या तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यापीठाचे पोलिस अधिकारी अॅडम गार्सिया म्हणाले, संशयिताचा मृत्यू कसा झाला, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. विद्यापीठात हल्ला होताच विद्यापीठाच्या अधिकृत एक्सवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना अलर्ट करण्यात. विद्यापीठानं पोस्टमध्ये म्हटलं ही टेस्टिंग नाही. लगेच लपून राहा आणि लढा.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले?21 वर्षीय पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणाला, हा क्षण खूपच धक्कादायक आहे. तुम्ही तुमच्या पालकांना कॉल करून खूप प्रेम करत असल्याचं सांगावे लागेल असा हा क्षण आहे. सुरुवातीला आम्ही गोळीबार ऐकला नाही किंवा कोणी जखमी झाल्याचे पाहिले नाही. परंतु पोलिसांनी शेजारच्या इमारतीत प्रवेश करताना असताना खिडकीतून बाहेर पाहिले. काही वेळाने पोलिसांनी येऊन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

हेही वाचा-

Last Updated : Dec 7, 2023, 8:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.