ETV Bharat / international

Global Indian Award : सुधा मूर्तींना ग्लोबल इंडियन अवॉर्ड; पहिल्या भारतीय महिला - SUDHA MURTY

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना इंडो कॅनडियन कार्यक्रमात कॅनडा इंडिया फाउंडेशननं 'ग्लोबल इंडियन अवॉर्ड' देऊन सन्मानित केलं. त्या इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.

Global Indian Award
Global Indian Award
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 10:29 PM IST

टोरंटो : इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती, यांना कॅनडा इंडिया फाऊंडेशननं 'ग्लोबल इंडियन अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड दरवर्षी प्रख्यात भारतीयाला दिला जातो. एखाद्या क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात येत. या पुरस्काराची रक्कम $50,000 आहे.

पुरस्कार मिळणं माझ्यासाठी सन्मान : कॅनडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश ठक्कर यांनी शनिवारी रात्री सांगितलं, 'सुधा मूर्ती यांना ग्लोबल इंडियन अवॉर्ड प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द भावी पिढ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खर्च केली आहे. भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारताना सुधा मूर्ती म्हणाल्या, 'तुमच्या देशाकडून हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.' या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल कॅनडा इंडिया फाऊंडेशनचे (सीआयएफ) आभार मानताना मूर्ती म्हणाले, 'सीआयएफ हा महाभारतातील कृष्णासारखा आहे. कृष्ण हा देवकीचा मुलगा आणि यशोदेचाही. देवकी ही त्यांची जन्मदात्री होती आणि यशोदेने त्यांचं पालनपोषण केलं. तुम्ही भारतात जन्मलात, पण इथेच स्थायिक झालास, ही यशोदा आहे आणि तुमची आई भारत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलयं.

इंडो-कॅनेडियन भारतीय संस्कृतीचे वाहक : इंडो-कॅनेडियन स्थलांतरितांबद्दल त्या म्हणाल्या की 'तुम्ही वेगळ्या भूमीत भारतीय संस्कृतीचे वाहक आहात. कृपया हे चालू ठेवा. 2014 मध्ये त्यांच्या पतीलाही हाच पुरस्कार मिळाल्याचं सुधा मूर्ती म्हणाल्या. 'या पुरस्कारामध्ये एक मजेदार गोष्ट आहे. कारण नारायण मूर्ती यांनाही हा पुरस्कार 2014 मध्ये मिळाला होता आणि मला 2023 मध्ये मिळालाय. त्यामुळं हा पुरस्कार मिळवणारे आम्ही पहिले जोडपे आहोत.

बक्षिसाची रक्कम द फील्ड इन्स्टिट्यूटला दान : त्यांनी बक्षिसाची रक्कम द फील्ड इन्स्टिट्यूट (टोरंटो विद्यापीठ) ला दान केलीय. हे विद्यापीठ गणितासह अनेक विषयांमध्ये सहकार्य, नाविन्य आणि शिक्षण मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. टोरंटो फेस्टिव्हल इव्हेंटमध्ये सुधा मूर्ती त्यांच्या जावई आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या आई-वडिलांसोबत होत्या.

हेही वाचा -

  1. UK Glasgow Gurdwara Row : भारतीय राजदूताला कट्टरवाद्यांनी रोखले, ग्लासगो गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तीव्र निषेध
  2. Maldives Elections : मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू बनू शकतात नवे राष्ट्रपती, भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?
  3. One World Family The Art of Living : संगीत नृत्यासह प्रेरणांद्वारे एकता समरसतेचा जागतिक संदेश देणारा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जागतिक सांस्कृतिक महोत्सव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.