ETV Bharat / international

Sri Lankan Prime Minister Resigns : रनिल विक्रमसिंघे यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

author img

By

Published : Jul 9, 2022, 7:35 PM IST

रानिल विक्रमसिंघे ( Sri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe ) यांनी शनिवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी राजीनामा देण्याचे बोलले होते. देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी मार्ग काढता यावा म्हणून आपण राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Sri Lankan Prime Minister Resigns
रनिल विक्रमसिंघे यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

कोलंबो - रानिल विक्रमसिंघे ( Sri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe ) यांनी शनिवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी राजीनामा देण्याचे बोलले होते. देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी मार्ग काढता यावा म्हणून आपण राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्वपक्षीय सरकार स्थापन झाल्यानंतर आणि संसदेत बहुमत मिळाल्यानंतर ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील, असे पंतप्रधानांच्या माध्यम विभागाने म्हटले आहे. तोपर्यंत विक्रमसिंघे पंतप्रधानपदी कायम राहतील, असे त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की या आठवड्यापासून देशव्यापी इंधन वितरण पुन्हा सुरू होणार आहे हे लक्षात घेऊन आपण पद सोडण्याचा निर्णय घेत आहोत. जागतिक अन्न कार्यक्रमाचे ( WFP ) संचालक या आठवड्यात देशाच्या दौऱ्यावर येणार ( World Food Programme Director visit Sri Lanka ) आहेत. IMF साठी कर्ज सातत्य अहवाल लवकरच अंतिम केला जाईल.

राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला नागरिकांचा घेराव - श्रीलंकेतील ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकारविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या निदर्शकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला चारही बाजूंनी घेराव ( Siege of President Gotabaya Rajapaksa residence ) घातला. त्यानंतर त्यांना घर सोडून पळून जावे लागले. त्याच वेळी, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे ( PM Ranil Wickremesinghe )यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि जलद तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच ते सभापतींना संसद बोलावण्याची विनंती करत आहेत.

हेही वाचा - Sri Lanka Crisis : आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घातला घेराव, गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून काढला पळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.