ETV Bharat / international

Mahinda Rajapaksa Resigns : आर्थिक संकटापुढे महिंदा राजपक्षेंनी टेकले गुडघे; दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा - महिंदा राजपक्षे राजीनामा मराठी बातमी

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ( Mahinda Rajapaksa Resigns ) आहे. राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( President Gotabaya Rajapaksa ) यांच्याकडे पाठवला आहे.

Mahinda Rajapaksa
Mahinda Rajapaksa
author img

By

Published : May 9, 2022, 6:58 PM IST

कोलंबो - आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ( Mahinda Rajapaksa Resigns ) आहे. राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे पाठवला ( President Gotabaya Rajapaksa ) आहे. आपल्या राजीनाम्याबाबत महिंदा राजपक्षे यांनी ट्विट करुन स्वत: माहिती दिली आहे.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनाम्यापूर्वी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, "श्रीलंकेतील नागरिकांना मी संयम बाळगण्याचे आवाहन करत आहे. लक्षात ठेवा हिंसा केवळ हिंसाचारला जन्म देते. आर्थिक संकटात आपल्याला समाधानाची गरज आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी येथील प्रशासन वचनबद्ध आहे."

  • While emotions are running high in #lka, I urge our general public to exercise restraint & remember that violence only begets violence. The economic crisis we're in needs an economic solution which this administration is committed to resolving.

    — Mahinda Rajapaksa (@PresRajapaksa) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शुक्रवारी श्रीलंकन मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती. त्यामध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांच्या राजीमान्यासाठी सरकारवर दबाव वाढला होता. आणीबाणी आणि पंतप्रधानाच्या राजीनाम्यासाठी सरकाविरोधी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतीच्या निवास्थानाबाहेर निदर्शने केली. निदर्शन करणाऱ्यांवर लष्कराने कारवाई केली. या कारवाईत 23 लोक जखमी झाले आहेत.

  • Effective immediately I have tendered my resignation as Prime Minister to the President.

    අගමැති ධූරයෙන් ඉල්ලා අස්වීමේ ලිපිය ජනාධිපතිතුමා වෙත යොමු කළෙමි.

स्थानिक वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपक्षे यांचे प्रवक्त रोहन वेलीविता यांनी सांगितले की, पंतप्रधान राजपक्षे यांनी आपली राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. "मी तातडीने राजीनामा देत आहे. जेणेकरुन तुम्ही देशाला सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नवीन सरकारची नियुक्ती कराल," असे राजपक्षे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.

दरम्यान, श्रीलंका मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशामध्ये परदेशी चलनाची कमतरता आहे. अन्नधान्याची कमतरता आणि वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल, डिझेलचा देखील तुटवडा देशात निर्माण झाला आहे. याविरोधात नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे. त्याचपार्श्वभूमीवर पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. मात्र, सरकारवर दबाव वाढत असल्याने अखेर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा - NIA Raids In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.