जोहान्सबर्ग : झोपडीतून झालेल्या वायू गळतीमुळे 24 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील एकुरहुलेनी येथील बॉक्सबर्ग येथील अँजेलो वस्तीत बुधवारी रात्री घडली. झोपडीतून झालेला हा वायू नायट्रेट ऑक्साईड असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र वायू गळती नेमकी कशामुळे झाली, याचा अद्याप उलगडा झाला नाही.
अधिकारी घेत आहेत मृतांचा शोध : झोपड्यातून झालेल्या वायू गळतीमुळे 24 नागरिकांना आपली जीव गमवावा लागला आहे. अधिकारी अजूनही इतर बळींचा शोध घेत असल्याची माहिती एकुरहुलेनी ईएमएसचे प्रवक्ते विल्यम नटाल्डी यांनी दिली. अधिकारी आसपासच्या झोपड्यांचा शोध घेत आहेत. वायू गळती नेमकी कोणत्या झोपडीतून झाली याची माहिती घेण्यात येत आहे. सिलेंडर नेमका कुठे होता, त्याचाही शोध घेण्यात येत असून त्यामुळे आसपासच्या मृतांचा शोध घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-
A suspected gas leak has killed as many as 24 people in Boksburg, South Africa, a suburb just outside of Johannesburg https://t.co/TzIhIbKywc pic.twitter.com/fsAbhCH0MB
— Al Jazeera English (@AJEnglish) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A suspected gas leak has killed as many as 24 people in Boksburg, South Africa, a suburb just outside of Johannesburg https://t.co/TzIhIbKywc pic.twitter.com/fsAbhCH0MB
— Al Jazeera English (@AJEnglish) July 6, 2023A suspected gas leak has killed as many as 24 people in Boksburg, South Africa, a suburb just outside of Johannesburg https://t.co/TzIhIbKywc pic.twitter.com/fsAbhCH0MB
— Al Jazeera English (@AJEnglish) July 6, 2023
गॅस गळती कधी सुरू झाली याची माहिती नाही : या परिसरात वायू गळती झाल्यानंतर नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर वायू गळती झाल्याची माहिती प्रशासनाला मिळताच आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत तब्बल 24 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. गॅस गळती कधी सुरू झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. रात्री आठ वाजता पथक घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत 24 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
मृतांमध्ये महिलांसह मुलांचा समावेश : एकुरहुलेनी परिसरात झालेल्या वायू गळतीमध्ये 24 नागरिकांचा बळी गेला आहे. या बळी गेलेल्या नागरिकांमध्ये महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरचे दृश्य भयानक असल्याची माहिती येथील ईएमएस अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला आम्हाला स्फोट झाल्याची माहिती देणारा फोन आला असे स्थानिक मेट्रो पोलीस विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र अधिक तपास केल्यानंतर हा स्फोट नसून वायू गळतीची घटना असल्याचे निष्पन्न झाले. अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचे असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गॅस सिलेंडर वापरून सोने शुद्ध : झामा झामा नागरिक समुदायामध्ये राहतात. त्यांचा समुदाय या परिसरात राह असून ते येथे गॅस सिलेंडर वापरून सोने शुद्ध करतात. दुर्दैवाने यावेळी गॅस सिलिंडरची गळती झाली, त्यामुळे झोपलेल्या नागरिकांचा जीव गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरील डॉक्टरांनी दिली. जागे झालेल्या इतर नागरिकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र धूर खूप होता. वायू वेगाने पसरत असल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या क्षणी सर्वात लहान बळी दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुले असल्याची माहिती ईएमएस अधिकाऱ्याने दिली. मृतदेहाचे अवशेष गळतीच्या स्त्रोताजवळील टाऊनशिपमध्ये विखुरलेले आढळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.