ETV Bharat / international

Sitting All Day Is Terrible : दिवसभर बसुन काम करणे आरोग्यासाठी धोकादायक, चालणे हा सर्वोत्तम व्यायाम - चालणे हा सोपा व परवडणारा उपाय

कीथ डायझ, कोलंबिया विद्यापीठातील वर्तणुकीशी संबंधित औषधांचे सहयोगी प्राध्यापक आहेत. दिवसभर बसून राहण्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान का होते? याबद्दल त्यांनी काही अभ्यासपूर्ण कारणे सांगितली आहे.

Sitting All Day Is Terrible
चालणे हा सर्वोत्तम व्यायाम
author img

By

Published : Jan 14, 2023, 6:33 PM IST

न्यूयॉर्क : बसण्याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी दर अर्ध्या तासाने पाच मिनिटे हलके चालणे सुरु करा, असे कोलंबिया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक कीथ डायझ सांगतात. ते म्हणतात की, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मेडिसीन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या नवीन अभ्यासाचा हा मुख्य निष्कर्ष हाच आहे.

11 व्यक्तींवर प्रयोग : आम्ही 11 निरोगी मध्यमवयीन आणि वृद्ध प्रौढांना आमच्या प्रयोगशाळेत आठ तास बसण्यास सांगितले होते. यासगळ्यांवर आम्ही वेगवेगळ्या तासाला आणि वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळे प्रयोग केलेत. बसण्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी अधिका अधिक चालायला सांगणे, हे आमचे ध्येय होते.

रक्तदाब पाच पॉईंटने कमी : या लोकांमध्ये आम्ही रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब, हृदयविकाराच्या दोन महत्त्वाच्या जोखीम घटकांमधील बदल मोजले. आम्हाला आढळून आले की, दर अर्ध्या तासाला पाच मिनिटे हलके चालणे हा एकमेव असा उपाय आहे, ज्यामुळे दिवसभर बसून राहण्याच्या तुलनेत रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. विशेषतः, दर अर्ध्या तासाने पाच मिनिटांच्या चालण्याने खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची वाढ जवळपास 60% कमी होते. त्या उपायमुळे दिवसभर बसण्याच्या तुलनेत रक्तदाब चार ते पाच गुणांनी कमी झाला. आणि कमी आणि कमी वेळा चालण्याने रक्तदाबही सुधारला. दर तासाला फक्त एक मिनिट हलके चालल्याने रक्तदाब पाच पॉईंटने कमी झाला.

थकवा होतो गायब : शारीरिक आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त, चालण्याच्या व्यायामाने विश्रांतीचे मानसिक आरोग्य फायदे देखील होते. अभ्यासादरम्यान, आम्ही सहभागींना प्रश्नावली वापरून त्यांची मानसिक स्थिती रेट चेक करण्यास सांगितले. आम्हाला असे आढळून आले की, दिवसभर बसून राहण्याच्या तुलनेत, दर अर्ध्या तासाने पाच मिनिटांच्या हलक्या चालण्याने थकवा कमी होतो, सहभागींचा चांगला मूड होतो आणि त्यांना अधिक उत्साही वाटण्यास मदत होते. आम्हाला असेही आढळले की, दर तासाला एकदा चालणे देखील मूड वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी पुरेसे आहे.

हे महत्त्वाचे का आहे : जे लोक तासनतास बसून असतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे कर्करोग यांसारखे जुनाट आजार दिवसभर फिरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होतात. बैठी जीवनशैलीमुळे लोकांना लवकर मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. परंतु दररोज फक्त व्यायाम केल्याने, बसून आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम तेवढे प्रभावी होऊ शकत नाही.

वर्क फ्रॉम होम अडचण : तांत्रिक प्रगतीमुळे, यूएस सारख्या औद्योगिक देशांमध्ये प्रौढ व्यक्तींचे बसून वेळ घालवण्याचे प्रमाण अनेक दशकांपासून सातत्याने वाढत आहे. आता बरेच प्रौढ लोक त्यांच्या दिवसाचा बहुतांश वेळ बसून घालवतात. कोविड-१९ महामारी सुरू झाल्यापासून ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. तसेच अनेकांचे काम घरुन सुरु झाल्यामुळे, लोकांचा कल आजकाल घराबाहेर पडण्याकडे कमी झुकत आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, 21 व्या शतकातील वाढत्या सार्वजनिक आरोग्य समस्येचा सामना करण्यासाठी धोरणे आवश्यक आहेत.

चालणे हा सोपा व परवडणारा उपाय : सध्याची आरोग्यविषयीची मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की प्रौढांनी कमी बसावे, अधिक चालावे. परंतु या शिफारशी किती वेळा आणि किती वेळ चालाव्यात यासाठी कोणताही विशिष्ट सल्ला किंवा धोरणे देत नाहीत. आमचे कार्य सोपे आणि परवडणारे उपाय सांगते. प्रत्येक अर्ध्या तासाला पाच मिनिटांचे हलके चाला. जर तुमची नोकरी किंवा जीवनशैली असेल जिथे तुम्हाला दीर्घकाळ बसावे लागते, तर हा एक वर्तणूक बदल असुन; तुमचे आरोग्य धोके कमी करू शकतो.

पुढे काय आहे: आम्ही सध्या दीर्घकाळ बसून राहण्यामुळे होणारी आरोग्य हानी कमी करण्यासाठी 25 हून अधिक विविध धोरणांची चाचणी घेत आहोत. बर्‍याच प्रौढांकडे ट्रक किंवा टॅक्सी चालवण्यासारख्या नोकऱ्या असतात, जिथे ते दर अर्ध्या तासाने चालत जाऊ शकत नाहीत. तेव्हा तुलनात्मक दृष्ट्या त्यांनी इतर काही मार्ग शोधायला हवेत. शेवटी लोकांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जीवनशैलीसाठी सर्वोत्तम कार्य करणारे उपाय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.