ETV Bharat / international

Chinese Spy Balloon : आता लॅटिन अमेरिकेत दिसला दुसरा चिनी बलून, पेंटागॉनने केली पुष्टी

author img

By

Published : Feb 4, 2023, 11:10 AM IST

लॅटिन अमेरिकेत एक संशयास्पद चिनी बलून उडताना दिसला आहे. गुरुवारी अमेरिकेच्या मोंटाना येथे असाच एक चिनी बलून दिसला होता. या घटनेवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, हा बलून एक चिनी नागरी एअरशिप होता जो त्याच्या नियोजित मार्गापासून भटकला होता.

Chinese Spy Balloon
चिनी बलून

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मोंटाना शहरावर एक संशयास्पद चिनी बलून दिसल्यानंतर आता आणखी चिनी बलून लॅटिन अमेरिकेवर उडताना दिसला आहे. पेंटागॉनने शुक्रवारी याबद्दल माहिती दिली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्या चीनच्या दौऱ्यापूर्वी होत असलेल्या या घटनांमुळे दोन राष्ट्रांमध्ये आधीच असलेले तणावपूर्ण संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक रायडर यांनी सांगितले की, यूएस सरकार अनेक दिवसांपासून या बलूनचा मागोवा घेत आहे.

गुरुवारी अमेरिकेत दिसला बलून : गुरुवारी अमेरिकेच्या मोंटाना येथे एक चिनी बलून दिसला होता. मोंटाना हे एक विरळ लोकसंख्या असलेले राज्य आहे. येथील माल्मस्ट्रॉम एअर फोर्स बेस येथे अमेरिकेतील केवळ तीन आण्विक क्षेपणास्त्र सायलो फील्डपैकी एक फील्ड आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, अमेरिकन सरकारने सध्या अमेरिकेच्या हवाई हद्दीत उडत असलेला हा बलून शोधून काढला आहे. त्याचा मागोवा घेणे चालू आहे. उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) सध्या त्याचा मागोवा घेत आहे आणि घटनेचे बारकाईने निरीक्षण करत आहे. या चिनी बलूनचा आकार तीन बस एवढा असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनने व्यक्त केला खेद : पेंटागॉनच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, हा बलून एक चिनी नागरी एअरशिप होता जो त्याच्या नियोजित मार्गापासून भटकला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात प्रवक्त्याने म्हटले की, हे एअरशिप चीनचे आहे. हे एक नागरी एअरशिप आहे जे मुख्यतः हवामानविषयक संशोधनासाठी वापरले जाते. वेस्टर्लीजमुळे प्रभावित झालेले हे एअरशिप त्याच्या नियोजित मार्गापासून भटकल्या गेले. आम्ही या एअरशिपने अमेरिकेच्या हवाई हद्दीत अनपेक्षितरित्या प्रवेश केल्याबद्दल खेद व्यक्त केरतो.

पेंटागॉनच्या अहवालाची पडताळणी करत आहोत : चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी शुक्रवारी बीजिंगमध्ये पत्रकारांना सांगितले की, ते चिनी बलूनबाबत पेंटागॉनच्या अहवालाची पडताळणी करत आहेत. चीनने तथ्य स्पष्ट होईपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. चीन एक जबाबदार देश आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे नेहमीच काटेकोरपणे पालन करतो. कोणत्याही सार्वभौम देशाच्या भूभागाचे किंवा हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा : Chinese Spy Balloon Over US : अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात दिसला संशयास्पद चिनी बलून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.