ETV Bharat / international

भारताच्या मानात आणखी तुरा, मुळचे महाराष्ट्रीयन असलेल्या समीर शाह यांची बीबीसीच्या चेअरमन पदी निवड - who is bbc chairman

मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या समीर शाह यांची बीबीसीच्या चेअरमन पदी निवड झाली. ते लवकरच औपचारिकपणे बीबीसीच्या चेअरमन पदाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Samir Shah BBC Chiarman
Samir Shah BBC Chiarman
author img

By PTI

Published : Dec 7, 2023, 9:30 AM IST

Updated : Dec 7, 2023, 10:03 AM IST

लंडन- भारतात जन्मलेले माध्यमातील दिग्गज पत्रकार अशी ओळख असलेल्या डॉ. समीर शाह यांची बीबीसीच्या चेअरमन पदी निवड झाली. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ इंग्लंडमधील माध्यमात काम केले. यापूर्वीच डॉ. समीर शाह यांना यूके सरकारचे पसंतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

समीर शाह यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारण्यापूर्वी हाऊस ऑफ कॉमन्स मीडिया कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट सिलेक्ट कमिटीच्या क्रॉस-पार्टी खासदारांद्वारे नियुक्तीपूर्व छाननीसाठी चौकशी केली जाईल. समीर शाह यांचा जन्म जानेवारी 1952 मध्ये औरंगाबादमध्ये झाला. ते 1960 मध्ये इंग्लंडला गेल्यानंतर तिथेच शिक्षण आणि नोकरी केली. त्यांनी पश्चिम लंडनमधील लेटिमर अप्पर स्कूल या स्वतंत्र शाळेत शिक्षण घेतले. तर हल विद्यापीठातून भूगोल विषयात पदवी घेतली आहे.

संधी मिळणं हा सन्मान- समीर शाह यांचे बीबीसीच्या चेअरमन पदाच्या शर्यतीत नाव होते. तेव्हा समीर यांनी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा शाह म्हणाले, की बीबीसी ही जागतिक संस्कृतीत मोठे योगदान देत आहेत. माझ्या कारकीर्दीत या संस्थेला भेडसावणाऱ्या जटिल समस्यांवर मात करण्यासाठी संधी मिळणं हा सन्मान असेल. बीबीसीचं ब्रिटीश लोकांच्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. संपूर्ण देशभरातील प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याचं आमचं कर्तव्य आहे. वाढत्या स्पर्धात्मक प्रेक्षकांची गरज पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी - शाह हे बीबीसीमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रमांचे प्रमुख होते. शाह यांनी 2007 ते 2010 दरम्यान बीबीसीचे अ-कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे. समीर शाह हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून रेस रिलेशनशिप तज्ज्ञ आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर इंग्लंडमधील दोन समुदायात संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे लीसेट्र शहरात झालेल्या अशांततेची आढावा घेण्याकरिता इंग्लंड सरकारनं तीन सदस्यीय पॅनेलची घोषणा केली होती. त्या समितीतदेखील शाह यांचे नाव होते.

पत्रकारितेत 40 वर्षांहून अधिक काळ अनुभव- ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनबद्दल (बीबीसी) शाह यांचा अनुभव आणि ज्ञान पाहून युके सरकारनं समीर शाह यांची निवड केली. प्रसारणातील विविधतेला चालना देण्यासाठी ते आग्रही असतात. यूकेच्या संस्कृती सचिव लुसी फ्रेझर यांनी नियुक्ती प्रक्रियेनुसार समीर शाह यांच्या निवडीची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, टीव्ही प्रॉडक्शन आणि पत्रकारितेत समीर शाह यांना 40 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. बीबीसीला वेगाने बदलण्यासाठी शाह यांची स्पष्ट महत्त्वाकांक्षा आहे. भविष्यातील आव्हाने आणि संधींचा सामना करण्यासाठी समीर शाह हे योगदान देणार आहेत, यात मला शंका नाही.

हेही वाचा-

Last Updated : Dec 7, 2023, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.