ETV Bharat / international

Ripudaman Singh shot dead: रिपुदमन सिंह मलिक यांची कॅनडामध्ये हत्या

कॅनडामध्ये राहणारे वादग्रस्त शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 1985 च्या एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

रिपुदमन सिंह मलिक यांची कॅनडामध्ये हत्या

author img

By

Published : Jul 15, 2022, 11:13 AM IST

ओटावा: कॅनडात राहणारे वादग्रस्त शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 1985 च्या एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणात ते निर्दोष सुटलेले होते. रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडातील व्हँकुव्हर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता ते त्यांच्या कार्यालयात जात असताना ही घटना घडली. रिपुदमन सिंह यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. मोदी सरकारने शीख समुदायासाठी उचललेल्या अभूतपूर्व पावलांसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र लिहिले. यातूनच मलिकची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे.

हत्या करणारे अज्ञात - या वृत्ताला दुजोरा देताना मलिक यांचा मेहुणा जसपाल सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, "रिपुदमन यांची हत्या कोणी केली याबाबत आम्हाला खात्री नाही. त्यांची धाकटी बहीण कॅनडाला जात आहे." एअर इंडिया फ्लाइट 182 कनिष्क बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींपैकी मलिक एक होता. 23 जून 1985 रोजी, आयर्लंडच्या किनार्‍याजवळ कॅनडाहून एअर इंडियाच्या 182 'कनिष्क' या विमानात बॉम्बस्फोट झाला होता. ज्यात 329 प्रवासी आणि पायलटसह सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 280 हून अधिक कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. त्यामध्ये 29 संपूर्ण कुटुंबे आणि 12 वर्षाखालील 86 मुलांचा समावेश होता.

बब्बर खालसा संघटनेशी संबंध - रिपुदमन मलिक हा पंजाबमधील अनेक दहशतवादी घटनांसाठी जबाबदार असलेल्या बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. एअर इंडिया बॉम्बस्फोटाचा कथित सूत्रधार तलविंदर सिंग परमार याचा जवळचा सहकारीही होता. बब्बर खालसा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. अमेरिका, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांनी तिच्यावर बंदी घातली आहे. त्याची कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मलिकने निर्दोष सुटण्यापूर्वी चार वर्षे तुरुंगात घालवली. नंतर वकिलाच्या फीची नुकसान भरपाईची रक्कम म्हणून US$9.2 दशलक्ष मागितले होते. तथापि, ब्रिटिश कोलंबियाच्या न्यायाधीशाने नुकसानभरपाईसाठीचे त्यांचे दावे नाकारले. एअर इंडियाच्या फ्लाइट 182 वर बॉम्बस्फोट हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. बळी पडलेले बहुतांश कॅनेडियन होते. कॅनडामध्ये बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि एका कटाचा परिणाम होता.

भारतात येण्यास होती बंदी - रिपुदमन सिंग मलिक यांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, नंतर शीख संघटनांच्या विनंतीवरून मोदी सरकारने त्यांना 2020 मध्ये सिंगल एंट्री व्हिसा दिला. यानंतर मे महिन्यात दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात तीर्थयात्रा केल्याचे सांगितले जात आहे. तो कॅनडात खालसा शाळा चालवत असे. गेल्या काही काळापासून सतत कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर होता. अलीकडच्या काळात त्यांनी भारतातील शिखांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले होते.

हेही वाचा - KERALA BECOMES FIRST STATE TO HAVE OWN INTERNET: केरळ ठरले स्वत:चे इंटरनेट सेवा देणारे पहिले राज्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.