काहिरा : अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिस्त्रच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी आज मिस्त्रच्या अल-हकीम मशिदीचा दौरा करणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी इजिप्तमधील कहिरा येथील ११व्या शतकातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळाला श्रद्धांजली अर्पण करतील. अल-हकीम मशीद आणि मिस्त्र यांचे सामायिक समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे. या मशिदीचे भारताच्या दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे आज रविवारी मोदींचा मशीद दौरा भारतासाठी विशेष आहे.
फातिमी राजवंशाने बनवली मशीद : इजिप्त सरकारच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने सांगितले की, भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मिस्त्रमधील भारताचे राजदूत अजीत गुप्ते म्हणाले की, 11व्या शतकात इजिप्तवर फातिमी राजवंशाचे राज्य असताना बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला आपले पंतप्रधान भेट देतील. बोहरा समाज 1970 पासून मशिदीची देखभाल करत आहे. ते म्हणाले, 'म्हणूनच पंतप्रधानांचे बोहरा समाजाशी खूप प्रेम आहे. बोहरा समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची त्यांच्यासाठी ही संधी असेल. दरम्यान पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदी विराजमान होण्यापासून त्यांचे बोहरा समुदायाशी चांगले संबंध आहेत.
-
#WATCH मिस्र: काहिरा में हसन अल्लम प्रॉपर्टीज के सीईओ मोहम्मद मेधात हसन आलम ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात के बाद कहा, "एक नेता के रूप में, एक दूरदर्शी के रूप में प्रधानमंत्री मोदी एक अविश्वसनीय व्यक्ति हैं। मुझे उनके साथ यह बैठक जानकारी पूर्ण, शिक्षाप्रद और प्रेरणादायक… https://t.co/w556zVZkbA pic.twitter.com/p1iYpS8wFl
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH मिस्र: काहिरा में हसन अल्लम प्रॉपर्टीज के सीईओ मोहम्मद मेधात हसन आलम ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात के बाद कहा, "एक नेता के रूप में, एक दूरदर्शी के रूप में प्रधानमंत्री मोदी एक अविश्वसनीय व्यक्ति हैं। मुझे उनके साथ यह बैठक जानकारी पूर्ण, शिक्षाप्रद और प्रेरणादायक… https://t.co/w556zVZkbA pic.twitter.com/p1iYpS8wFl
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023#WATCH मिस्र: काहिरा में हसन अल्लम प्रॉपर्टीज के सीईओ मोहम्मद मेधात हसन आलम ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात के बाद कहा, "एक नेता के रूप में, एक दूरदर्शी के रूप में प्रधानमंत्री मोदी एक अविश्वसनीय व्यक्ति हैं। मुझे उनके साथ यह बैठक जानकारी पूर्ण, शिक्षाप्रद और प्रेरणादायक… https://t.co/w556zVZkbA pic.twitter.com/p1iYpS8wFl
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023
पंतप्रधान इथेही भेट देणार: पंतप्रधान मोदी इजिप्तमधील हेलिओपोलिस वॉर ग्रेव्ह स्मशानभूमीलाही भेट देणार आहेत. पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी मोदी येथेही जाणार आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध अधिक दृढ होतील. यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी चर्चा करतील. दोन्ही देशांची ही आत्मयीता फक्त लोकांमधील संबंधांना चालना देणार आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील आर्थिक विकास आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीमध्ये योगदान करण्यासाठी एक व्यासपीठ ही तयार होईल. पंतप्रधान मोदींचा इजिप्त दौरा दोन दिवसाचा असून उद्या तो संपणार आहे. यावर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राष्ट्राध्यक्ष अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांचा भारत दौरा अत्यंत यशस्वी ठरला होता. त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही देशांनी त्यांचे संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर वाढवण्यास सहमती दर्शवली.
-
पीएम नरेंद्र मोदी और मिस्र के पीएम मुस्तफा मैडबौली ने काहिरा में राउंडटेबल बैठक की। pic.twitter.com/CHvyE6ovsU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पीएम नरेंद्र मोदी और मिस्र के पीएम मुस्तफा मैडबौली ने काहिरा में राउंडटेबल बैठक की। pic.twitter.com/CHvyE6ovsU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023पीएम नरेंद्र मोदी और मिस्र के पीएम मुस्तफा मैडबौली ने काहिरा में राउंडटेबल बैठक की। pic.twitter.com/CHvyE6ovsU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 24, 2023
हेही वाचा -