समरकंद ( उझबेकिस्तान ): PAK PM Shehbaz Sharif शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ( एससीओ ) च्या वेळी Shanghai Cooperation Organization meeting रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन Russian President Putin यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये हास्याचे पात्र बनले. रशियन सरकारी वृत्तसंस्था आरआयएने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहबाज शरीफ हे हेडफोन लावत असताना गोंधळलेले पाहावयास मिळाले. त्यावेळी पुतीन यांनाही हसू आवरले नाही.
हा व्हिडिओ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) ने देखील शेअर केला आहे. त्यात हे देखील दिसून आले की शहबाज एका सहाय्यकाला मदतीसाठी विचारत होते. परंतु सहाय्यकाच्या मदतीनंतरही त्यांचे हेडफोन पुन्हा खाली पडले. पीटीआयच्या एका सदस्याने सांगितले की, शेहबाज हे पाकिस्तानसाठी सतत लाजिरवाणे आहेत.
-
Pak PM Shehbaz becomes laughing stock as he struggles with headphones during bilateral meeting with Putin
— ANI Digital (@ani_digital) September 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/KoqRaqkiJo#ShehbazSharif #VladimirPutin #SCOSummit2022 pic.twitter.com/fNpqiwBJ9d
">Pak PM Shehbaz becomes laughing stock as he struggles with headphones during bilateral meeting with Putin
— ANI Digital (@ani_digital) September 16, 2022
Read @ANI Story | https://t.co/KoqRaqkiJo#ShehbazSharif #VladimirPutin #SCOSummit2022 pic.twitter.com/fNpqiwBJ9dPak PM Shehbaz becomes laughing stock as he struggles with headphones during bilateral meeting with Putin
— ANI Digital (@ani_digital) September 16, 2022
Read @ANI Story | https://t.co/KoqRaqkiJo#ShehbazSharif #VladimirPutin #SCOSummit2022 pic.twitter.com/fNpqiwBJ9d
नॅशनल असेंब्लीचे माजी डेप्युटी स्पीकर आणि पीटीआयचे बलुचिस्तानचे प्रांताध्यक्ष कासिम खान सूरी यांनी शेअर केलेल्या आणखी एका छायाचित्राने शाहबाज यांच्या शिष्टमंडळाचा समाचार घेतला. ज्यात परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी, अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा समावेश होता. जे आळशीपणे बसले होते.
शाहबाज यांनी ट्विट केले की, "समरकंदमधला तो एक लांबला पण फलदायी दिवस होता. आमच्या मित्र देशांच्या नेत्यांसोबतच्या माझ्या बैठकीत आम्ही व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर सहमती दर्शवली. मी हवामान बदलामुळे आलेल्या पुराच्या संकटांचे स्पष्टीकरण दिले. अन्न आणि ऊर्जा टंचाई हे आमच्या सामायिक विकास अजेंड्यासमोर खरे आव्हान आहे."