ETV Bharat / international

Ban Sikh From Growing Beard : शीख सैनिकांना दाढी वाढविण्यास बंदी; 'हे' दिले कारण - न्यूयॉर्क पोलिसांची सैनिकांना दाढी वाढविण्यास बंदी

न्यूयॉर्क पोलिसांनी शीख सैनिकांना दाढी वाढविण्यास बंदी घातली आहे. या विरोधात आता शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारत सरकारने याबाबत लवकरात लवकर काहीतरी पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. (Ban Sikh From Growing Beard).

Ban Sikh From Growing Beard
शीख सैनिकांना दाढी वाढविण्यास बंदी
author img

By

Published : Jul 30, 2023, 4:23 PM IST

चंदीगड : अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोलीस विभागाने एका शीख सैनिकाला दाढी वाढवण्यास मज्जाव केल्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. शीख संघटनांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी जोरदार टीका केली आहे. 'अमेरिकेच्या सर्वांगीण विकासात शीखांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. भारत सरकारने याबाबत लवकरात लवकर काहीतरी पावले उचलावीत, असे ते म्हणाले आहेत. (Ban Sikh From Growing Beard).

जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांचे परराष्ट्र मंत्रालयाला आवाहन : फार पूर्वी शीखांनी यूएस आर्मी आणि सिव्हिल सर्व्हिस सेक्टरमध्ये सेवा करण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढाई जिंकली होती. त्यानंतर शिखांना अमेरिकेत प्रत्येत क्षेत्रात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले होते. परंतु आता न्यूयॉर्क पोलीस विभागाने एका शीख सैनिकाला दाढी ठेवण्यास बंदी घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 'परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात अमेरिकन पोलिसांशी बोलायला हवे जेणेकरुन शिखांना त्यांचे अधिकारी परत मिळू शकतील', असे ग्यानी रघबीर सिंग म्हणाले आहेत.

न्यूयॉर्क पोलिसांनी काय कारण दिले : न्यूयॉर्क पोलिसांनी दाढी वाढवण्यावर बंदी घालण्याच्या बाजूने युक्तिवाद करताना, सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. शीख सैनिक त्यांच्या दाढीमुळे मास्क घालू शकणार नाहीत. ज्यामुळे त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात, आणि आम्ही त्यांच्या आरोग्याशी खेळू शकत नाही, असे न्यूयॉर्क पोलिसांचे म्हणणे आहे.

2016 मध्ये शिखांना अधिकार मिळाला होता : न्यूयॉर्क पोलिस विभागातील शीख सैनिकांना 2016 मध्ये प्रदीर्घ लढाईनंतर ड्युटीवर असताना पगडी घालण्याचा अधिकार मिळाला होता. त्यावेळी विभागाने शिखांना दाढी ठेवण्याचा अधिकारही दिला होता. मात्र दाढीची लांबी अर्धा इंच असावी असे निर्देश देण्यात आले होते. आता मात्र अमेरिकेतील शीख पोलिसांनी मोठी दाढी ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.

हे ही वाचा :

  1. Gangster Ravinder Samra : पंजाबी गँगस्टर रविंदर समराची गोळ्या झाडून हत्या
  2. Telangana Girl Hungry In America : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलगी उपासमारीने त्रस्त, आईने लिहिले परराष्ट्र मंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.